गुन्हेगारीचाळीसगावब्रेकिंग

शेतजमीन नावावर करण्यासाठी ५ हजाराची लाच स्वीकारताना तलाठीसह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात..

चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील बोरखेडा येथील तक्रारदार यांची बोरखेडा बु॥ येथील वडिलोपार्जित शेतजमीन त्यांचे नावे आहे. तक्रारदार यांचे हिश्यावर एकुण ३ गट वाटणीस आलेले आहेत. सदर ३ गटांपैकी ६४/२ ही शेतजमीन तक्रारदार यांना त्यांच्या पत्नी यांचे नावे करायची आहे जेणेकरून ते अल्पभूधारक म्हणून गणले जातील,म्हणून नोव्हेंबर-२०२१ मध्ये तक्रारदार यांनी सदरचे प्रकरण तलाठी बोरखेडा यांच्याकडे सादर केले आहे. सदर काम न झाल्यामुळे तक्रारदार हे तलाठी ज्ञानेश्वर सूर्यभान काळे यांना तलाठी कार्यालयात जावून भेटले असता त्यांनी तक्रारदार यांच्या नावे असलेली शेतजमीन त्यांचे पत्नी यांचे नावे करण्याच्या मोबदल्यात कोतवाल किशोर गुलाबराव चव्हाण यांच्या मार्फत प्रथम ७,०००/-रु.लाचेची मागणी केली होती, तडजोडीअंती ५,०००/-रू रक्कम ठरली.

यादरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्याकडे तक्रार केली होती त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून दि.२३/०३/२०२३ रोजी सदर मागणी केलेली लाच रक्कम रु ५०००/- स्विकारतांना तलाठी व कोतवाल यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे