गुन्हेगारीयावल

वृद्ध व्यक्तिचा र्निघुण खून परिसरात एकच खळबळ 

यावल ( प्रतिनिधी )- तालुक्यातील किनगाव येथील भिमराव शंकर सोनवणे वय ६० वर्ष (वाहनचालक) या वयोवृद्धाचा अज्ञात व्यक्तिने धारधार हत्याराने र्निघुणखुन केल्याची घटनासमोर आली आहे .

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील भिमराव शंकर सोनवणे वय ६० वर्ष(वाहनचालक ) यांचा , गुरुवारी रात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने धारधार हत्याराने गळा चिरून, दगडाने ठेचुन खुन केल्याची घटना घडली आहे. व चुंचाळे रस्त्यावरील किनगाव शिवारातील ढोल्या मोह नदीच्या पुलाखाली मृतदेह आढळून आल्याने किनगाव व चुंचाळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे , घटनेचे वृत्त कळताच फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे यांच्यासह पोलीस पयक घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला आहे घटनास्थळी स्वानपथकास बोलविण्यावा आले आहे . मागील चार ते पाच महीन्याच्या कालावधीत अशा प्रकारे खून झाल्याची तालुक्यातील ही चौथी घटना आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात खुन झालेल्या व्यक्तिचा मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा खून कुणी व कशासाठी झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे