जळगाव

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जळगाव तर्फे.”पक्षांसाठी दाणा पाणी” उपक्रम अंतर्गत परळ वाटप

जळगाव(प्रतिनिधी)-निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जळगावतर्फे पक्षांसाठी दाणापाणी हा उपक्रम काव्यरत्नावली चौक या ठिकाणी राबवण्यात आला. स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून व राज्याध्यक्ष प्रमोद दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जळगाव शहरात राबविण्यात आला. उन्हाळ्याची चाहूल लागलेली असून दिवसेंदिवस उन्हाचे तापमान आता वाढत जाईल. या तीव्र उन्हाचे चटके सर्व प्राणीजनमात्रांना सहन करावे लागतात. त्यातच तीव्र उन्हामुळे पक्षीही नामशेष होत जातात. या पक्षांना वाचवण्यासाठी त्यांना दाणापाणी उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांना मातीचे परळ वाटप करण्यात आले याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की परदेशी पक्षी आपल्याकडे भरपूर येत असतात अशा पक्षांना भर उन्हाळ्यात वाचवणे खूप गरजेचे आहे यासाठी धान्याची एक परळ व पाण्याची एक परळ त्यांना प्रत्येकाने उपलब्ध करून दिली पाहिजे तरच निसर्गाचा पर्यावरण समतोल राखला जाईल. आणखी मोठ्या संख्येने परळ उपलब्ध करून देण्याचे दातृत्व देखील त्यांनी स्वीकारले. याप्रसंगी मातीच्या मोठ्या आकाराच्या पक्क्या परळ नागरिकांना वाटप करण्यात येऊन पक्षी संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. उपक्रमाचा उद्देश राज्य उपाध्यक्ष सौ मनिषा पाटील यांनी मांडला. याप्रसंगी राज्य कार्यकारणी सल्लागार तनुजा मोती, जिल्हा उपाध्यक्ष ज्योती राणे ,नूतनतास खेडकर, कार्याध्यक्ष नेहा जगताप, किमया पाटील ,शशी शर्मा, रेणुका हिंगु, कांचन पाटील, आशा मौर्य, नीता वानखेडकर, नयना जगताप, ज्योती नलगे, माधुरी वाणी, हर्षा गुजराती हे उपस्थित होते.उपक्रमाचे प्रास्ताविक ज्योती राणे यांनी केले व आभार नेहा जगताप हिने मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे