चाळीसगाव

चाळीसगाव वासीयांची प्रतीक्षा संपली…

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते घाट रोड बाजार समिती पर्यंतचा रस्ता कॉक्रीटीकरण कामासाठी २० कोटींचा निधी मंजूर...

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश, गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागणार

चाळीसगाव (प्रतिनिधी)– छत्रपती शिवाजी महाराज चौक – स्टेशन रोड ते नागद रोड बाजार समिती पर्यतच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे सदर रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. अखेर गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली असून आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने सदर रस्त्याच्या कॉक्रीटीकरणासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकार सत्तेत आल्यानंतर तात्काळ सर्व आमदार यांच्या शिफारशीनुसार CRF अंतर्गत कामांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्याच्या चौपदरी कॉक्रीटीकरण कामाचा प्रस्ताव दिला होता. त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या अवर सचिवांनी याबाबत दि.३१ मार्च रोजी पत्र काढून सार्वजनिक बांधकाम नाशिक विभागाचे मुख्य अभियंता यांना सदर कामाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शहरातील मुख्य रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे

मुख्य रस्त्याच्या कामामुळे नागरिकांचा प्रवास सुसह्य व शहराच्या सौंदर्यात भर पडेल – आमदार मंगेश चव्हाण

छत्रपती शिवाजी महाराज चौक – स्टेशन रोड ते घाट रोड हा चाळीसगाव शहरातील मुख्य रस्ता आहे. मात्र खराब रस्त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची मलादेखील जाणीव होती. मागे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल दयानंद पर्यंतच्या रस्त्याचे काम आमदार निधीतून केले होते. तसेच खरजई नाका ते हॉटेल दयानंद पर्यंतच्या रस्त्याचे काम देखील नगरविकास निधीतून सुरू आहे. मात्र अतिशय रहदारीच्या व शहरातील मुख्य अश्या स्टेशन रोड रस्त्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी यासाठी त्याचे कॉक्रीटीकरण करणे गरजेचे होते. त्यासाठी दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळून CRF निधीतून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या सूचना जाणून घेत लवकरच सदर कामाला सुरुवात करण्यात येईल. केवळ रस्त्याचे कॉक्रीटीकरणच नव्हे तर सदर रस्त्याच्या दुभाजकांचे सुशोभीकरण आदी कामांचा देखील यात समावेश करण्यात येईल.त्यामुळे या रस्त्यावरून दररोज वापरणाऱ्या हजारो नागरिकांचा प्रवास केवळ सुसह्यच होईलच पण शहराच्या सौंदर्यात देखील भर घालण्याचा माझा मानस आहे. माझ्या मागणीची दखल घेत भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय सडक व परिवहनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण, नामदार गिरिषभाऊ महाजन यांचे मी चाळीसगाव वासीयांच्या वतीने मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे