दहीगावात फलकाची विटंबना : गावात तणावपूर्ण शांतता – सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
यावल(प्रतिनिधी)- तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषाच्या प्रतिमेची अज्ञात समाजकंटकाकडून विटंबना केल्याने रविवारी सकाळपासून गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. घटनेची खबर मिळताच फैजपूर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पो. नि. राकेश माणगावकर पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचत पोलीसांसह सरपंच अजय अडकमोल यांनी शांततेचे आवाहन केले आहे. यासंदर्भात सहा संशयीतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .दरम्यान गावातील वातावरण तणावपूर्ण शांत आहे. गावात पोलीस बंदोबस्त तैनात असून सायंकाळपर्यंत उपअधीक्षक कुणाल सोनवणे ,पो.नि.राकेश माणगावकर पोलीस अधिकारी व ताफ्यासह तळ ठोकून होते.
तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषाच्या प्रतिमेची शनिवारी रात्री अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली. रविवारी सकाळी या घटनेचे वृत्त गावात कळताच, मोठ्या संख्येने जमाव मुख्य चौकात जमून सुमारे तीन तास पोलीस चौकी समोर ठिय्या आंदोलन दिले पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने थोर पुरुषाच्या प्रतिमेचे शुद्धीकरण केले याप्रसंगी सरपंच अजय अडकमोल,कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांचे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून चोपडा आणि विविध ठिकाणावर दंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलीस अधिकारी फौजदार अविनाश दहिफळे, सुनील मोरे, सुनिता कोळपकर यांचे सह पोलीस ताफा तैनात आहे. या संदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा पोलिसांनी सह संशयीतांना अटक केले असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे पो. नि. मानगावकर यांनी सांगितले.गावात तणावपूर्ण वातावरण असल्याने यावल दहिगाव सावखेडा बस सेवा सकाळपासून बंद होती.