जळगाव

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर च्या मंडल क्र.2 दाना बाजार परिसर, ‘घर घर चलो संपर्क अभियान’ राबविण्यात आले..

जळगाव– आपल्या देशाचे पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाले या निमित्त ‘मोदी @९ जनसंपर्क अभियान’ ३०मे ते ३० जून राबविण्यात येणार आहेत या अनुषंगाणे आज भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर च्या वतीने मंडल क्र.२ मध्ये ‘घर घर चलो संपर्क’ जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) व जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. यावेळी उद्योजकांच्या दुकानावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला व देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या कार्याची पुस्तिका त्यांना देण्यात आली.

याप्रसंगी संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ राधेश्याम चौधरी, अमित देशपांडे, ‘घर घर चलो संपर्क’ अभियानाचे प्रमुख जयेश भावसार, नगरसेवक मुकुंदा सोनवणे,भरत सपकाळे, प्रल्हाद सोनवणे, मंडल अध्यक्ष परेश जगताप, कपिल पाटील, अशोक राठी, हर्षल चौधरी, रेखा राणा, छाया मालपाणी, तृप्ती पाटील, योगेश तिवारी, किशोर चौधरी, शुभम सोनार यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे