यावल

सावखेडा सिम ग्रामपंचायत मधील अनियमिततेच्या चौकशीसाठी पंचायत समितीचे माजी गटनेते यांचा आमरण उपोषणाचा इशारा

यावल – तालुक्यातील सावखेडासिम येथील ग्रामपंचायतीस सन २०२० पासून आलेल्या विविध निधी अंतर्गत आलेली अनियमिता व अपहार केल्याच्या तक्रारी गेल्या दहा महिन्यात वेळोवेळी करूनही त्यासंदर्भातील चौकशी होत नसल्याने येथील पंचायत समितीचे माजी गटनेते (काँग्रेस) शेखर सोपान पाटील व ग्रामस्थ १४ ऑगस्ट पासून येथील पंचायत समिती समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा श्री पाटील यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

तालुक्यातील, सावखेडासिम येथील ग्रामपंचायतीस आलेल्या वेगवेगळ्या निधीचा अनियमित उपयोग तसेच निधीचा अपहार करण्यात आल्याची तक्रार पंचायत समितीचे काँग्रेसचे माजी गटनेते शेखर पाटील यांनी येथील गटविकास अधिकारी यांचेकडे करत १४ ऑगस्ट पासून ग्रामस्थांसह मागण्या मान्य होईस्तोवर उपोषणास बसणार असल्याचा इशारा देत उपोषण काळात उपोषणकर्त्यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाला तर त्या प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात नमूद केले आहे.दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायत सावखेडा येथील सन २०२० पासून तर आज पर्यंत आलेल्या पंधराव्या वित्त आयोगातील कामाचे अनियमित टेंडर व अनियमित कामांची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करणे , तसेच ग्रामनिधी पाणीपुरवठा निधीमध्ये झालेल्या अपहारास कारणीभूत असलेल्यां वर तात्काळ कार्यवाही करणे, त्याचप्रमाणे एकाच ठेकेदारास बेकायदेशीर कामे दिल्याने दोषी असलेल्या ग्रामसेवकास निलंबित करण्यात यावे अशा मागण्यांचा समावेश आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे