जळगाव

महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन(आयटक) तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने…

जळगाव – महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन(आयटक) संलग्न तसेच महाराष्ट्र आयटक शाखेच्या संघटनेचे   देशपातळीवर कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचे वतीने आज दि.९  रोजी क्रांती दिन निमित्त केंद्र व राज्य सरकार हटाओ या प्रमुख मागणीसह ईतर महत्वाचे मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव समोर निदर्शने करण्यात आली.केंद्र व राज्य शासनाच्या सार्वजनिक उद्योग, वीज क्षेत्रातील खाजगीकरण,संरक्षण क्षेत्रातील खाजगीकरण, आरोग्य सेवा मध्ये कंत्राटी करण, कोळसा खाण उद्योग मध्ये खाजगी उद्योगांना शिरकाव करण्याचा जनतेच्या महत्वाचे जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढ व महागाई मुळे सामान्य माणसाला जगण्यासाठी करावी लागणारी कसरत या बाबतीत लक्ष वेधून न्याय मिळवून देण्यासाठी आज च्या दिवशी निदर्शने करण्यात आली.महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे जळगाव परिमंडळ सचिव तथा राज्य संयुक्त सचिव कॉ.विरेंद्रसिंग पाटील, यांनी मार्गदर्शन केले.कॉ.प्रभाकर महाजन,कॉ.किशोर जगताप,कॉ.शरद बारी, महिला आघाडीच्या कॉ.संध्या पाटील,कॉ.विठ्ठल तायडे,कॉ.भगवान सपकाळे,कॉ.दीपक बडगुजर, कॉ.सचिन फड,कॉ.विकास तायडे, कॉ.महेश बिचवे,कॉ.किरण सपकाळे,कॉ.किरण चव्हाण यांनी सहभाग घेतला आयटक चे वतीने प्रदेश उपाध्यक्ष कॉ.अमृत महाजन यांनी संबोधित केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे