यावल

यावल ला जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा..

यावल : यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने शहरातुन समाज बांधवांच्या वतीने सजीव देखाव्यांच्या रॅल्या काढण्यात आल्या होत्या व यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात जागतिक आदिवासी दिना कार्यक्रम घेण्यात आला होता.

यावल शहरातील जिल्हास्तरीय एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सकाळपासूनच मोठ्या संख्येत आदिवासी समाज बांधवांनी या कार्यालयात उपस्थिती दिली होती. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुका शहरातून काढण्यात आल्या. या मिरवणुकींनी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले. तर या मिरवणुका एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात आल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित हे होते. तर प्रमुख उपस्थितीत आमदार शिरीष चौधरी, तहसिलदार मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड, नायब तहसिलदार रशीद तडवी,जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, प्रकल्प अधिकारी अरूण पवार, यावलच्या माजी नगराध्यक्ष नौशाद तडवी, मुक्ताईनगर नगराध्यक्ष नजमा तडवी, प्रतिभा चव्हाण, पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील, जुबेदा तडवी, माजी उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, दिलरुबाब तडवी, बबलू कोळी, राजू तडवी, एम.बी. तडवी, मीना तडवी, नवाज तडवी, एड. याकुब तडवी, रोनक तडवी, हुसेन तडवी, इब्राहिम तडवी, जलील पटेल, रवींद्र सोनवणे, सुखदेव बोदडे, संदीप सोनवणे, चेतन आढळकर, उमेश फेगडे, राकेश फेगडे, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, सागर कोळी, वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, सुनील भिलावे, सार्वजनिक बांधकाम उपाभियंता जे.एन. तडवी, गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके, मुनाफ तडवी सह मोठ्या संख्येत आदिवासी समाज बांधवांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.पी. पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहायक प्रकल्प अधिकारी पी.पी. माहुरे यांनी मानले

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे