गुन्हेगारीयावल

अट्रावलला दोन गटात दंगल, ५ जण जखमी, १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल.

यावल (प्रतिनिधी): तालुक्यातील अट्रावल येथे मागील भांडणाच्या कारणावरून वाद होत दोन गटांमध्ये हाणामारी होवून त्यात पाच जण जखमी झाले असून परस्पर गटाकडून यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून १३ जणांविरुद्ध दंगली सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात डीवायएसपी सह पोलिस निरिक्षकांनी भेट देवुन पोलिस बंदोबस्त लावला आहे.अट्रावल ता. यावल येथे मागील भांडणाच्या कारणावरून पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्या असे सांगत दोन गटांमध्ये वाद झाला आणी दोन गटात दंगल घडली यामध्ये रितेश दिवाकर तायडे वय १९, छाया दिवाकर तायडे वय ३८, चेतन वासुदेव कोळी वय २४, चंद्रकांत पंडित कोळी वय ५३ व हेमंत चंद्रकांत कोळी वय २४ असे दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले. जखमींना यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले. येथे वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण, अधिपरिचारीका ज्योत्ना निंबाळकर, अमोल अडकमोल आदींनी प्रथमउपचार केले यातील गंभीर जखमी दोघांनी पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्यात आले तर घटनेची माहिती मिळताच फैजपूरचे डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर हे पथकासह दाखल झाले व परिस्थितीवर नियंत्रण मिळवत गावात चोख पोलिस बंदोबस्त लावला तर याप्रकरणी छायाबाई दिवाकर तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हेमंत चंद्रकांत कोळी, चेतन वासुदेव कोळी, कैलास संतोष कोळी, निलेश संजय कोळी, चंद्रकांत पंडित कोळी, सरस्वतीबाई वासुदेव कोळी व अंजनाबाई चंद्रकांत कोळी या सात जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे.

दुसऱ्या गटाकडून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

दुसऱ्या गटाकडून चेतन वासुदेव कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माझ्याकडे काय बघतो या कारणावरून फिर्यादी व त्याच्या मित्रांना रितेश दिवाकर तायडे, दिवाकर उर्फ पिंटू तायडे, पद्माकर टोपलु तायडे, चिंतामण पंढरी तायडे, कुणाल चिंतामण तायडे व छायाबाई दिवाकर तायडे या सहा जणांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली तेव्हा याप्रकरणी सहा जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे