सावदा परिसरात अवैध धंदे बंद; फौजदाराचे कौतुक..
रावेर प्रतिनिधी -हमीद तडवी
सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे नव्याने आलेले दबंग अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी बंद केले आहे त्यामुळे अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ माजली आहे.
सावदा परिसर केळी उत्पादकांचा व भारतातील सर्वात मोठी केळीची व्यापार पेठ म्हणून ओळखला जातो या भागात कामगारांना रोज रोजंदारी मजुरी मिळत असते.यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध असल्याने अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोपवले होते.
त्यामुळे अनेकांचे संसार अवैध धंद्यामुळे उघड्यावर पडत होते अनेक सामाजिक संस्था अध्यक्ष व राजकीय व्यक्तींनी अवैध धंदे बंद करण्याची मागणी लावून धरली होती त्या अनुषंगाने सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेऊन घेऊन सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.
सावदा परिसरातील सर्व सामान्य जनता अवैध धंद्यामुळे खुश असली तरी अवैध धंदे चालक मात्र रोजच आपले धंदे चालू करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या चकरा मारीत आहे यासाठी अनेक पोलीस शिपाई त्यांना थेट फौजदारांच्या केबिनमध्ये जागा मिळवून देऊन अवैध धंदे चालू करण्याची विनंती करीत असल्याने फक्त दिखावा म्हणूनच अवैध धंदे बंद राहू नये अशी परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.
हप्ते वाढवण्यासाठी अवैध धंदे बंद?
सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद असले तरी सावदा पोलीस ठाणे हद्दीतील काहीच कर्मचारी हे हप्ते वाढवण्यासाठी अवैध धंदे चालकांच्या भेटीगाठी घेत असल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे यामुळे फक्त दिखावा म्हणून तर अवैध धंदे बंद केले नाही ना अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या
भुसावळात तीन लाखांच्या नकली नोटांसह तिघांना अटक..
शेतीपिक नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी ई KYC- करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..