यावल

यावल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ७९.३० टक्के मतदान, किनगावच्या एका बुथ वर ९९ टक्के मतदानाचा उच्चांक.

यावल : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक आणि चार ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत रविवारी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली होती व साडेपाच वाजेनंतर काही मतदान केंद्रावर गर्दी दिसायला मिळाली तर वेळेत यावल तालुक्यात २२ हजार १४१ मतदारांपैकी १७ हजार ५५७ मतदारांनी मतदान केले. एकुण तालुक्यात ७९.३० मतदान झाले आहे यात किनगाव खुर्दच्या एका बुथ वर विक्रमी ९९.०७ टक्के मतदान झाले असुन आता सोमवारी यावल तहसील कार्यालयामध्ये दहा लोकनियुक्त सरपंच आणि ७७ सदस्यांच्या निवडी करिता मतमोजणी केली जाणार आहे.

यावल तालुक्यात नऊ ग्रामपंचायत च्या लोकनियुक्त ९ सरपंच तर चार ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत एक लोकनियुक्त सरपंच सह एकुण सदस्य च्या ७७ जागेसाठी रविवारी मतदान झाले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती. मतदान केंद्राच्या बाहेर विविध उमेदवारांच्या वतीने मतदार मदत केंद्र उभारण्यात आले होते व या ठिकाणी येणाऱ्या मतदाराला वोटर चिठ्ठी देण्याचे काम उमेदवारांकडून सुरू होते. एकूण यावल तालुक्यात शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली सायंकाळी साडेपाच वाजेचा वेळ असल्याने त्यानंतर देखील काही मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी झाली होती तर यावल तालुक्यातील या सर्व ग्रामपंचायतच्या २२ हजार १४१ मतदारांपैकी १७ हजार ५५७ मतदारांनी मतदान केले व तालुक्यात एकुण ७९.३० टक्के मतदान झाले. संपुर्ण मतदान प्रक्रिया तहसीलदार मोहनमाला नाझीरकर सह निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार रशीद तडवी यांच्या देखरेखीत निवडणूक निर्णय अधिकारी जी.टी. सोनवणे, सचिन जगताप, ए. वाय. बडगुजर, एम. पी. देवरे, एम.एच. तडवी, मीना तडवी, बबीता चौधरी, एस. एल. पाटील, एच. एन. तडवी, व्ही.डी. पाटील, एन.पी. वैराळकर, ए. एस. खैरनार, एस. आर. शेकोकार, के. पी. वायसे यांनी पार पाडली तर सोमवारी यावल तहसिल कार्यालयात सकाळी १० वाजेे पासुन मत मोजणीला सुरवात होणार आहे.

किनगावात विक्रमी मतदान.

किनगाव खुर्दच्या प्रभाग क्रमांक २ च्या एका बुथ वर ४३१ मतदार होते त्या पैकी तब्बल ४२७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला ही टक्केवारी ९९.०७ इतकी होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे