गुन्हेगारी

पाच लाखाची लाच : सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकारी ACB च्या जाळ्यात..

जळगाव- शहरात जिल्हा कारागृहात लाच घेतल्याची घटना ताजी असतानाच जळगाव येथील सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकारी या दोघांना पाच लाखाची लाच घेतांना जळगाव एसीबी च्या पथकाने रंगेहाथ पकडले असुन रवींद्र शालिग्राम सपकाळे विस्तार अधिकारी ( चार्ज सहाय्यक गट विकास अधिकारी वर्ग २) पंचायत समिती जळगांव व पद्माकर बुधा अहिरे , विस्तार अधिकारी पंचायत समिती जळगाव,( वर्ग ३ )असे त्यांचे नाव व पद असुन या कारवाईने लाचखोरांच्या गोठ्यात मोठी खळबळ उडाली आहे.

जामनेर तालुक्यातील तक्रारदार हे सुद्धा लोकसेवक असून त्यांचे विरुद्ध चालू असलेल्या चौकशी समितीमध्ये रवींद्र शालिग्राम सपकाळे व पद्माकर बुधा अहिरे हे प्रमुख असून या चौकशी मधून तुम्हाला दोष मुक्त करतो तुमचा अहवाल चांगला पाठवितो त्यासाठी आम्हाला ५,००,०००/- रुपये द्यावे लागतील.अशी लाचेची मागणी रवींद्र शालिग्राम सपकाळे व पद्माकर बुधा अहिरे यांनी केली होती त्यानुसार ५०००००/-रुपये लाच स्वतः स्विकारतांना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांनी रंगेहाथ पकडले शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यांनी केला सापळा यशस्वी

हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे पोलीस निरीक्षक एन. जाधव,पो.ना. बाळू मराठे , पो.ना. सुनिल वानखेडे, राकेश दुसाणे स.फौ. दिनेशसिंग पाटील,सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन,पो.कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ.प्रणेश ठाकुर. पो कॉ सचिन चाटे आदींच्या पथकाने यशस्वी केला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे