गुन्हेगारीयावल

यावल तहसील कार्यालय परिसरातून जप्त केलेल्या वाहनाचा चोरीचा प्रयत्न…

यावल– तहसील कार्यालयात जप्त करण्यात आलेल्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चोरीचा प्रयत्न फसला.१४ नोव्हेंबर  च्या पहाटे कोतवालची नाईट ड्युटी संपल्यानंतर, एका अज्ञात व्यक्तीने वाळू वाहतूक करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी जप्त केलेले वाहन चोरण्याचा प्रयत्न केला. तहसील कार्यालय परिसरात वाहन सुरक्षितपणे ठेवण्यात आले होते. सदर वाहन बंद पडल्यामुळे व पाण्याच्या टाकी जवळ अडकल्यामुळे अज्ञात व्यक्तीनी तेथून पळ काढला.

सदर वाहन यावल पोलीस ठाण्यात हस्तांतरित केले आहे. स्थानिक अधिकारी सक्रियपणे तपास करत आहेत आणि भविष्यात तहसील कार्यालयाच्या ताब्यातील वस्तूंची सुरक्षा वाढवण्यासाठी पावले उचलली जातील.असे रावेर तालुका प्रशासनाने कळविले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे