3 हजाराची लाच घेतांना वायरमन ACB च्या जाळ्यात…
जळगाव – धानोरा येथील महावितरणच्या वायरमन ला 3 हजाराची लाच घेतांना जळगाव एसीबी च्या पथकाने रंगेहाथ पकडले असून अनिल शंकर राठोड , वरिष्ठ तंत्रंज्ञ, (वायरमन) वर्ग-4, धानोरा,ता चोपडा.असे त्यांचे नाव व पद असुन या कारवाईने लाचखोरांच्या गोठ्यात मोठी खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांचे पत्नीचे नावाने देवगांव ता. चोपडा शिवरात शेत गट नंबर 330 मध्ये शेतात 3 फेजचे ट्युबवेल चे मोटार साठी यातील तक्रारदार यांनी विजेचे कनेक्शन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार हे वायरमन अनिल शंकर राठोड, यांना संबधीत कामाबाबत भेटले असता वायरमन अनिल शंकर राठोड,यांनी तक्रारदार यांचेकडे त्या कामासाठी मला ४००० रुपये द्यावे लागतील असे सांगतिले. त्यांनतर आज रोजी अनिल शंकर राठोड, यांनी ४००० रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडअंती यातील अनिल शंकर राठोड, यांनी ३००० रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचेवर अडावद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे पोलीस निरीक्षक एन. जाधव,पो.ना. बाळू मराठे , पो.ना. सुनिल वानखेडे, राकेश दुसाणे स.फौ. दिनेशसिंग पाटील,सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन,पो.ना.अमोल सुर्यवंशी,पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ.प्रणेश ठाकुर. पो कॉ सचिन चाटे आदींच्या पथकाने यशस्वी केला.