
जळगाव – जिल्ह्यात गोळीबार सत्र सुरुच आहे. दि. 2 रोजी जळगाव एम.आय.डी.सी मध्ये दोन तरुणावर बेछुठ गोळीबार करण्यात आला होता त्यात दोघ तरुण गंभीर जखमी झाले होते ही घटना ताजी असतांनाच सलग दुसऱ्या दिवशी अजून एक गोळीबाराची घटना समोर आली आहे.

एरंडोल तालुक्यातील कढोली गावात आज दि.३ रोजी दुपारी एका ३१ वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून,मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्या मुळे त्याला तातडीने उपचारांसाठी जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत पोलीस गोळीबारा मागील नेमके कारण काय याचा तपास करत आहेत.