अट्टल चैन स्नेचींग चोर भुसावळ बाजारपेठ पोलीसांच्या ताब्यात…
भुसावळ – बाजारपेठ पो.स्टे चे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे अट्टल चैन स्नेचींग करणारा आरोपी मझर अब्बास जाफर, रा.मुस्लीम कॉलनी, भुसावळ याची माहिती काढुन त्यास ताब्यात घेतले असता त्याने अमळनेर पो. स्टे व जलम पो.स्टे. खामगाव तालुका येथे नोंद असलेले गुन्हे केले असल्याची कबुली दिली असुन त्याने अनुक्रमे 90,000/- रुपये किंमतीची 12 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व 70.000/- रुपये किमतीची 14.05 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असे एकुण 1,60,000/- रुपये किमतीचे सोन्याचे दागीणे जबरीने चोरी केलेले आहे. सदर आरोपीस पुढील कारवाई करीता अमळनेर पो.स्टे.च्या तपासी अंमलदार यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर कार्यवाही ही पोलीस निरीक्षक राहुल वाघ भुसावळ बाजारपेठ पो. स्टे यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पो. स्टे चे पो.उपनि. मंगेश बाधन, पोहेकों विजय नेकरक,पो. कॉ. प्रशांत परदेशी, पो.कॉ. योगेश माळी, पो.कॉ. राहुल वानखेडे, पो. कॉ. भुषण चौधरी, पो. कॉ. सचिन चौधरी, पो.कॉ. अमर आढळे, पो.कॉ.पो. कॉ. योगेश महाजन यांनी कारवाई केली आहे.