जळगाव

आदिवासी मंत्र्यांच्या विरोधात कोळी समाजाची घोषणाबाजी, कोळी समाजाला उपोषणाची परवानगी नाकारली.

जळगाव प्रतिनिधी | कोळी समाजाला आदिवासी जमातीचे जात प्रमाणपत्र मिळावे या सह अन्य मागण्यांसाठी आज पासून कोळी समाजाचे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी समाजाच्या वतीने आदिवासी कोळी समाजाला सरसकट अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी 26 दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते.

मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थितीत दोन महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषणाची सांगता केली होती. मात्र दिलेली वेळ पूर्ण होऊन देखील कोळी समाजाच्या मागण्या मान्य न झाल्याने पुन्हा कोळी समाजाने उपोषण सुरू केले आहे. यावेळी कोळी समाज आक्रमक झाला असून आजपासून आंदोलन करण्याच्या तयारीत असताना मात्र प्रशासनाने राजकीय दबावातून परवानगी नाकारल्याचा आरोप देखील कोळी समाजाने केला आहे.

त्यामुळे कोळी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुठलाही मंडप न टाकता खाली बसून आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा कोळी समाजाने घेतला असून आदिवासी विकास मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे