ब्रेकिंग

काँग्रेसच्या जनसंवाद बाईक रॅली मध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांनी केले असे काही..

जळगाव प्रतिनिधी | देशाचं भविष्य म्हणजे आजची तरुणाई, त्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून चांगल्या महाविद्यालयात पाठवले जाते. मात्र या महाविद्यालयात राजकीय कार्यक्रमात या विद्यार्थ्यांचा वापर केला जातो. काँग्रेस पक्षाचे आमदार शिरीष चौधरी रावेर मतदार संघाचे यांनी विद्यार्थ्यांना चक्क जनसंवाद यात्रा काँग्रेस पक्षाच्या वतीने काढलेले त्यामध्ये एका विद्यार्थ्याला आपला दुचाकीच्या रॅलीमध्ये अपघातामध्ये मृत्यू झाला.

 

अनेक ठिकाणी दाद अगितली पण त्यांना न्याय मिळाला नाही. 12 सप्टेंबर 2023 रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने रावेर मतदारसंघात काढण्यात आलेल्या जनसंवाद रॅलीमध्ये डी. एन. कॉलेज फैजपूर येथील बी.बी.ए. च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या स्व. भूवनेश डालुराम चेजारा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यासदर्भात सावदा पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र हा प्रकार इतर विद्यार्थ्यांसोबत होवू नये म्हणून मयत विद्यार्थ्याचे वडील हे देशभरात भ्रमंती करून जनजागृती करत आहेत.

 

आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी जनजागृती करत नेमके माझ्या मुलाचं काय चुकलं तो शिक्षण घेण्यासाठी गेला होता, परंतु राजकारण्यांच्या मताच्या राजकारणात त्याचा मृत्यू झाला आहे. तरी सर्व पालकांनी सतर्क रहावे माझ्यासारखे वेळ तुमच्यावर येऊ नये पुन्हा एकदा विद्यार्थी या राजकारणाच्या महत्वकांक्षांचा बळी पडू नये हा माझा प्रयत्न आहे असे आवाहन मयत भुवणेश च्या वडिलांनी केले आहे. तसेच यासदर्भात ते जनजागृती करण्यासाठी ते भारत भ्रमंती करत असून आतापर्यंत ३ हजार पेक्षा अधिक अंतर त्यांनी प्रवास केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे