३० हजाराची लाच खाजगी पंटरसह पोलिस हवलदार एसीबी च्या जाळ्यात..
अमळनेर – शहरात बांधकाम मटेरीयलची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकाचा डंपर अडवून साहेबांच्या नावे हफ्ता म्हणून ३० हजारांची लाच मागून ती पंटरच्या हस्ते स्वीकारताना हवालदारासह खाजगी पंटरला धुळे एसीबी च्या पथकाने रंगेहाथ पकडले. असुन हवालदार घनश्याम अशोक पवार व खाजगी पंटर इम्रानखान शब्बीरखान पठाण असे त्यांचे नावे असुन या कारवाईने लाचखोरांच्या गोठ्यात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांचा बांधकाम मटेरीयलचा व्यवसाय आहे. अमळनेरचे हवालदार घनश्याम पवार यांनी दि. ७ जानेवारी रोजी तक्रारदार यांचा डंपर अडवत त्यांच्याकडे पोलीस निरीक्षक विजय शिंदे व स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून ३० हजारांची लाच मागितली.
तक्रारदाराने याबाबत धुळे एसीबीकडे केली होती धुळे एसीबीने पडताळणी केल्यानंतर हवालदार पवार यांनी ३० हजारांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. धुळे एसीबी च्या पथकाने सापळा लाऊन खाजगी पंटर इम्रान खान याच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे घनश्याम पवार सांगितल्यानंतर लाचेची रक्कम खाजगी पंटर इम्रान खान शब्बीरखान पठाण याचे हस्ते स्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध अमळनेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने यशस्वी केला.