यावल

सेंद्रिय शेती काळाची गरज – मारकंडे मिटके 

यावल (सुरेश पाटील ) –  यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर युती सभा कार्यशाळेअंतर्गत कृषी विभागाच्या विविध योजना या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला यात विशेष म्हणजे सेंद्रिय शेती ही काळाची गरज कशी आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यावल कृषी विभागातील कृषी सहाय्यक.प्रकाश गुरव,गौरव कांबळे,समाधान पाटील,निखिल गायकवाड उपस्थित होते.प्रमुख वक्ते मारकंडे मिटके (कृषी सहायक यावल) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.उन्ह पावसात,थंडीत कष्ट करून शेतात धान्य पिकवतो म्हणून कोणत्याही कार्यक्रमात अन्नाचा नाश करू नये.पौष्टिक तृणधान्ये अन्नद्रव्ये गहू,तांदूळ हे अन्न शरीरासाठी पोषक ठरत नाही तर बाजरी ज्वारी,नागली,दादर याची भाकर शरीरासाठी पौष्टिक अन्न आहे.कडधान्यांमध्ये तूर, उडीद,मूग याचा वापर रोजच्या आहारात केला पाहिजे त्यात व्हिटामिन बी असते.हा आहार पचायला उपयुक्त व शरीरासाठी पोषक असल्यामुळे कोणतेही आजार उद्भवत नाही असे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम. डी.खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रगती आणि विकासासाठी महाराष्ट्र व भारत सरकारचा कृषी मंत्रालय सध्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना व शेतीत बदल घडविण्यासाठी कार्यरत आहे.शेतीसाठी लागणारे अवजारे,सौर पंप,सोलर,विहीर, बोरवेल,ट्रॅक्टर,नांगर जल सिंचनासाठी लागणारी साधने ठिबक सिंचन,तुषार सिंचन, शिकारा,जलपरी इत्यादी साधणे शेती विषयक योजना कृषी मंत्रालयाद्वारे शेतकऱ्यांना सबसिडीवर आधारित मिळत असतात त्याचा फायदा घेऊन सेंद्रिय पद्धतीने शेती केली पाहिजे. सेंद्रिय शेतीमध्ये प्रामुख्याने झाडांचा कुजलेला पालापाचोळा,शेणखत, सोनखत,गांडूळ खत,धरणातील गाळ हे खत पीक वाढीसाठी व उत्पन्नासाठी आवश्यक वापरावे जेणेकरून विषमुक्त अन्नधान्य खायला मिळते. पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव जाणवत असल्यास गोमूत्र, लिंबोळी कीटकनाशक वापरली पाहिजे तसेच मोकळ्या जागेत किंवा शेता बांधावर झाड लावली पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.सुधीर कापडे यांनी केले सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा रावते यांनी केले तर आभार डॉ.वैशाली कोष्टी यांनी मानले कार्यक्रमाला डॉ.हेमंत भंगाळे,डॉ.आर पवार,डॉ.संतोष जाधव,डॉ.निर्मला पवार,प्रा.सुभाष कामडी,प्रा.हेमंत पाटील,प्रा. छात्रसिंग वसावे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी  मिलिंद बोरघडे,संतोष ठाकूर,दुर्गादास चौधरी,प्रमोद भोईटे,दशरथ पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे संपर्क करा
WhatsApp Group