जळगाव (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते सदरच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन लोकार्पण सोहळादि.२७/०१/२००५ रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडला होता. त्यावेळी जळगाव जिल्हा पोलीस दलाला ८ मोबाईल फॉरेन्सिक वाहने देण्यात आलेली होती. दिनांक 30 रोजी परीक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे हे जळगाव जिल्हा पोलीस दलाचो वार्षिक निरीक्षण करीता आले असता त्यांनी पोलीस मुख्यालयातील परेड ग्राउंडवर सदरची ०८ मोबाईल फॉरेन्सिक वाहनांना हिरवा झेंडा दाखवुन सदर वाहने जिल्हा पोलीस दलात समाविष्ठ करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, गंभीर गुन्हा तपासण्यासाठी विशेषत सात किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा तज्ञ शांकडून घटनांस्थळावर त्वरित भेट देवुन फॉरेन्सिक सहाय्य पुरविण्यासाठी, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करणे, व विश्लेषण करणेसाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ह्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय गृहविभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत, जळगाव जिल्हा पोलीस घटकातील आठ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांकरीता उपलब्ध होणार आहे. सदर व्हॅन सोबत आवश्यक प्रशिक्षीत मनुष्यबळ, फॉरेन्सिक किट, रसायने, सॉफ्टवेअर पुरविण्यात येणार आहे. सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अंतर्गत क्राईम सीन अॅप्लिकेशन जे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेस्थळ तपासणी पुरावा संग्रहित करुन बारकोड द्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे, महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, जिल्हयातील सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांचे उपस्थितीत पार पडला