जळगाव
जळगांव जिल्हा पोलीस दलातील २३ सहायक पोलीस उप निरीक्षक (ASI) यांना पोलीस उप निरीक्षक ( PSI) पदावर पदोन्नती…
जळगांव – जिल्हा पोलीस दलातील श्रेणी पोलीस उप निरीक्षक ( PSI) पदा करीता निकषांची पुर्तता करीत असलेल्या व प्रतिक्षीत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) यापदावरील पोलीस अंमलदार यांना पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दि. 28 रोजी 23 सहायक पोलीस उप निरीक्षक (ASI) यांना श्रेणी पोलीस उप निरीक्षक ( PSI) पदावर पदौन्नतीचे आदेश पारीत केले.
पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी यांनी सर्व पदोन्नती झालेल्या श्रेणी पोलीस उप निरीक्षक (Grade PSI) यांना पुढील चांगल्या कामकाजाचे अनुषंगाने अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.