गुन्हेगारीजळगावब्रेकिंग

जळगावात २ गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक…

एमआयडीसी पोलीसांची गावठी कट्ट्याच्या दोन दिवसात दोन कारवाया

जळगाव – दि. 29 रोजी चे रात्री जे के पार्क मेहरुण बगीचा येथे काही ईसम हे गावठी पिस्टल घेवुन फिरल आहे बाबतची माहीती पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोस्टे यांना मिळाली होती. त्याप्रमाणे सदर ठिकाणी तीन ईसम हे मोटार सायकलवर उभे दिसले होते ते पोलीसांना पाहुण पळुन जात असतांना 01) दिपक लक्ष्मण तरटे वय 26 वर्ष रा नागसेन नगर रामेश्वर कॉलनी जळगाव, 02) अमन रशिद सैय्यद उर्फ खेकडा वय 21 वर्ष रा सुप्रीम कॉलनी जळगाव अशांना ताब्यात घेतले होते. व सदर ठिकाणाहुन विशाल राजु अहीरे हा पळुन गेला होता. पकडलेल्या इसमांची अंगझडती घेतली असता दोघांकडे प्रत्येकि एक एक असे दोन गावठी बनाटीचे कट्टे मिळुन आले होते. तसेच बजाज पल्सर मो सा क्र. एमएच १९ डीयु ४५६५ अशी मिळुन आली होती एकुण १२८०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल गावठी कट्टयासह मिळुन आला आहे. सदर चे गावठी कट्टे मिळुन आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दि. 28 रोजी केलेल्या कारवाई मधे अरशद शेख हमीद उर्फ अण्णा रा गेंदालाल मिल जळगाव याच्याकडे अजिंठा चौफुली जळगाव येथे गावठी कट्टा मिळुन आला होता. याप्रमाणे दोन कारवाया करण्यात आलेल्या आहे.

दिपक लक्ष्‌मण तरटे वय 26 वर्ष रा नागसेन नगर रामेश्वर कॉलनी जळगाव, अमन रशिद सैय्यद उर्फ खेकडा वय 21 वर्ष रा सुप्रीम कॉलनी जळगाव यांना अटक करण्यात आली असुन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती वसीम एम देशमुख यांनी त्यांना ७-४ दिवसाची पोलीस कस्टडी रीमांड दिली असुन सरकारतर्फ अॅडव्होकेट स्वाती निकम यांनी कामकाज पाहीले.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड पोउनी दिपक जगदाळे, पोउनी दत्तात्रय पोटे, सप्फी, अतुल वंजारी, पोहेका, सचीन मुंढे, पोहेका गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, पोना, किशोर पाटील, पोना, सचीन पाटील, पोना, योगेश बारी, सुधीर साबळे, पोका, किरण पाटील, पोका छगन तायडे, पोका, ललीत नारखेडे, राहुल रगडे यांनी केली आहे. सदर अमन रशिद सैय्यद उर्फ खेकडा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याच्यावर यापूर्वी एकुण 18 गुन्हे दाखल आहे तसेच दिपक लक्ष्मण तरटे याच्यावर 04 गुन्हे दाखल आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे