डोंगरकठोरा शिवारात अवैध वृक्षतोड करणारे दोघं ट्रॅक्टरसह वनविभागाच्या ताब्यात..
यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा ते हिंगोणा रस्त्यावर शुक्रवारी अवैधरित्या विविध जातीच्या वृक्षांची तोड करून वाहतुक करतांना एक ट्रक्टर वन विभागाच्या पथक मिळुन आले. तेव्हा मुद्देमालासह ट्रक्टर जप्त करीत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सातपुडा वनक्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरकठोरा ते हिंगोणा रस्त्या दरम्यान ८ मार्च २०२४ शनिवार रोजी रात्रीच्या सुमारास वन विभागाचे पथक गस्तीवर होते. यावल विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख व सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांना गुप्त माहितीच्या आधारावर मिळालेल्या माहिती वरून या पथकाने वरिल रस्त्यावर स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. २९ एम. ४९८४ पकडलेे यात अवैधरित्या निंब, करंज, सुबाभुळ जातीचे ६.३०० घन मिटर जळाऊ लाकुड वाहतुक होते तेव्हा ट्रक्टर व लाकुड असा सुमारे १ लाख ७५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला दोन जणांना ताब्यात घेतले. हा मुद्देमाल यावल वन आगारातील विक्री केन्द्रात जमा करण्यात आला आहे.याबाबत आगार रक्षक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास डोंगरकठोरा वनपरिमंडल अधिकारी रविन्द्र तायडे व वन विभागाचे नाकेदार बि. बि. गायकवाड हे करीत आहे