चोपडा व चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई, मोठ्या प्रमाणावर गावठी कट्टे जिवंत काडतुसे जप्त
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई
जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील चोपडा आणि चाळीसगाव पोलीसांच्या सतर्कतेने गावठी पिस्तूलांसह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात सहा जणांना अटक करण्यात यश आले आहे. यात चाळीसगाव पोलीसांनी केलेल्या कारवाईत चार गावठी पिस्तूल, ५ मॅगझीन, १० जिवंत काडतूसासह १ जणांना अटक केली तर चोपडा पोलीसांनी केलेल्या कारवाईत ९ गावठी पिस्तूल, २ मॅगझीन, २० जिवंत काडतूसासह ४ जणांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा पेालीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
जळगाव पोलीस दलातर्फ़े जिल्ह्यात दोन मोठया कारवाई करण्यात आली असून पहिल्या कारवाईत चोपडा ते मध्यप्रदेश बॉर्डर असलेल्या उमर्टी येथील येथून अवैधरित्या गावठी पिस्तूल विक्री करत असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळाली. त्यानुसार पथकाने कृष्णापुर ते उमर्टी दरम्यानच्या डोंगराळ भागातील रस्त्यावर चौघांवर कारवाई केली. यात चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ९ गावठी पिस्तूल, २० जिवंत काडतूस, २ रिकामे मॅगझीन, ४ मोबाईल आणि २ मोटरसायकल असा एकूण ४ लाख ७ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच दुसऱ्या कारवाईत आरोपीकडून गावठी बनावटीचे ४ पिस्तूल, ५ मॅक्झिन, १० जिवंत काडतूस, एक मोटरसायकल असा एकूण २ लाख १ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.