सावदा ते पाल रोडवर गुरांनी भरलेले सहा ट्रक पकडले..
बलवाड़ी प्रतिनिधी – आशीष चौधरी
सविस्तर वृत्त असे कि, सावदा ते पाल रोडावर दि. २७ रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास खिरोदा फॉरेस्ट नाक्याचे खाली रोडवर ६ आयशर ट्रक हस्तगत करण्यात आले. त्यात एकुण 105 लहान मोठ्या काळ्या रंगाच्या म्हशी आढळून आल्या. त्यांची किमत एकुण 69,67,600 लाख रु असल्याचे सांगितले जाते. या ट्रका मध्ये जनावरांचा वाहतुक परवाना नसतांना वाहनांमध्ये चारा पाण्याची व्यवस्था व कोणतीही वैद्यकिय व्यवस्था न पुरवता वाहनात पुरेशी जागा उपलब्ध नसतांना सुद्धा १०५ म्हैशी दाटीवाटीने भरुन वाहतुक करीत असतांना दिसून आले. यानुसार निलेश बाविस्कर सावदा पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल झाला असून 1) जहिरखान वाहेदखान रा. गंगापुरा आष्टा जिल्हा- सिहोर (मध्य प्रदेश), 2) राशिद रईस कुरेशी रा.गंगापुरा आष्टा जिल्हा- सिहोर (मध्य प्रदेश), 3) अकबर सिकंदर खान रा. सियापुरा जिल्हा देवास (मध्य प्रदेश), 4) वसिम रजाक कुरेशी रा.गंगापुरा आष्टा जिल्हा- सिहोर (मध्य प्रदेश), 5) सलमान अहेमद नुर रा. पठाणवाडी सारंगपुर जिल्हा राजगड मध्ये प्रदेश, 6) अफसर अबरार कुरेशी रा. नजरवाडीसमोर आष्टा जिल्हा- सिहोर (मध्य प्रदेश), 7) आझाद बाबु शेख रा. ईटावा जिल्हा- देवास मध्य प्रदेश, 8) फारुख लतीब कुरेशी नेतवाडा ता. जावर जिल्हा- सिहोर (मध्य प्रदेश), 9) साईद शहजाद खान रा. गजरागेट चौराहा देवास मध्य प्रदेश, 10) परवेज सादीक बेग रा. गोया ता. नागदा जिल्हा- देवास (मध्य प्रदेश), 11) अजमदखान रईस खान रा. अल्लीपुर आष्टा जिल्हा- सिहोर (मध्य प्रदेश), 12) नजिम नईम कुरेशी काजीपुरा आष्टा जिल्हा- सिहोर (मध्य प्रदेश). यांचे विरोधात तक्रारी वरुन उपरोक्त गुन्हा नोंद करण्यात आली.
काही म्हशींना बलवाडी ता रावेर येथील गोशाळेत पाठविण्यात आले आहे. बलवाड़ी गोशाळेत म्हशींना ऊतरवितांना भागवत महाजन , राजू महाजन, जितेन्द्र महाजन, सावदा पोलीस स्टेशन येथील जयराम खोडपे, सुनील सैंदाने, प्रकाश जोशी उपस्थित होते. पुढील तपास हा सावदा पोलीस स्टेशन चे सपोनि जालिंदर पळे यांचे आदेशाने जयराम खोडपे व सहकारी करीत आहे.