जळगाव

श्रीराम पाटील यांचे मतदारांतर्फे उस्फुर्तपणे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत..

राम नवमीनिमित्त्त घेतले रामलल्लाचे दर्शन 

रावेर ( प्रातिनिधी ) –रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आज मतदार संघातील ठिकठिकाणी भेटी दिल्या.राम नवमीनिमित्त त्यांनी श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. यावेळी नागरिकांनी पैल यांचे उस्फुर्तपणे स्वागत करीत प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आश्वासन दिले.

चोपडा येथील पाटील गढीतील पुरातन श्रीराम मंदिरात प्रभु श्रीरामांचे उमेदवार श्रीराम पैल यांनी दर्शन घेतले. यावेळीही राणू देशमुख, शशिकांत पाटील, जितेंद्र पाटील, तात्यासाहेब मधुकर गुरुजी यांच्यासह पाटील गढी मित्र मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. श्रीराम नवमीनिमित्त दरवर्षी सप्तशृंगी (वणी )गडावर जाणाऱ्या पाटील गढी मित्र मंडळातील पदयात्रेतील युवकांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावल तालुक्यात मतदारांकडून स्वागत

यावल तालुक्यातील शिरसाड येथील श्रीराम मंदिरात रामलल्लांचे दर्शन घेतले. यावेळी निर्मल पाटील, अनिल पाटील, भैय्या पाटील, नरेंद्र पाटील, प्रमोद ढाके, निलेश पाटील, पप्पू तळले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच तालुक्यातील साकळी येथे ग्रामपंचायतला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी साकळीचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील, उपसरपंच फक्रूद्दीनखान शौकतखान कुरेशी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते. श्रीराम पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आश्वासन यावेळी ग्रामस्थांनी दिले. यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले यांच्या कार्यालयाला महावीआकस आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी भीत दिली. यावल तालुका महाविकास आघाडीच्या मेळाव्याच्या नियोजनाबाबत म्हणविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी मुकेश येवले, रवींद्र सोनवणे, शेखर पाटील, संदीप सोनवणे, जलील पटेल, कदीर खान, प्रशांत पाटील यांच्यासह

महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते. तसेच यावल येथील प्रसिद्ध व्यापारी भगतसिंग देवनाथ पाटील यांचीही श्रीराम पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावल तालुक्यातील दहिगाव येथील मारुती व महादेव मंदिरात दर्शन घेत ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी वि का सोसायटीचे चेअरमन बाळकृष्ण पाटील, मिलिंद नेहते, संतोष पाटील, दिलीप चौधरी, दिनकर फेगडे, अनिल बढे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

जामनेरला प्रचंड उत्साह

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आज जामनेर येथे भेट दिली. जामनेर येथे नागररिकानी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व महाविकास आघाडीतील मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांशी निवडणुकी संदार्भात चर्चा केली. यावेळी जिल्हा निरीक्षक प्रसन्नजीत पाटील, डी के पाटील,, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी , रावेर लोकसभा संपर्क प्रमुख डॉ मनोहर पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, व्ही पपई पाटील, उत्तम पाटील, अशोक चौधरी , गौरव काळे, किशोर खोडपे, प्राल्हाद बोरसे यांच्यासह पदाधीकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे