स्मृतिचिन्हांची तीन दशकांची परंपरा सांगणारे ‘कलादर्श’चे स्मृतिचिन्ह प्रदर्शन..
जळगाव (प्रतिनिधी) : गेल्या तीन दशकांपासून विविध उद्योग व प्रतिष्ठानांसाठी आकर्षक स्मृतिचिन्हे बनविणाऱ्या शहरातील कलादर्श स्मृतिचिन्ह या संस्थेने आपल्या कलात्मक स्मृतिचिन्हांचे प्रदर्शन पु.ना.गाडगीळ ॲण्ड सन्स यांच्या सहकार्याने पु.ना.गाडगीळ कलादालनात दि. १६ ते ३० एप्रिल दरम्यान सुट्टीचे दिवस सोडून आयोजित केले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन(दि.१६) सकाळी १० वाजता जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते होणार आहे. गेल्या तीन दशकांपासून कलादर्श स्मृतिचिन्ह घडवित आहे. पारितोषिक मिळालेल्यांपेक्षा पारितोषिक न मिळालेल्यांना या स्मृतिचिन्हांविषयी अपूर्वाई असते. ते हाताळण्याचे कुतूहल असते. विविध कार्यक्रमांसाठी ॲक्रेलिक, फोमशीट तसेच पितळ, चांदी व सोने या धातूंपासून बनविलेली स्मृतिचिन्हे या प्रदर्शनात ठेवण्यात आली असून, जळगावकरांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट देवून हा स्मृतिचिन्हांचा कलात्मक प्रवास अनुभवावा, असे आवाहन कलादर्शचे संचालक सचिन चौघुले यांनी केले आहे.