जळगाव

जळगाव स्फोटातील अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू ; मृतांची संख्या ४ वर..

कंपनी मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनीधि) – शहरातील मोरया ग्लोबल केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात २२ जखमींपैकी दोन कामगारांचा गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या स्फोटातील मृतांची संख्या ४ वर गेली असून अद्यापही मृतांच्या नातेवाईकांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी कंपनीचे मालक अरुण निंबाळकर, व्यवस्थापक नोमेश रायगडे यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अजून दोन कामगारांची प्रकृती गंभीर

मृतांमध्ये किशोर दत्तात्रय चौधरी (वय ५०, रा. रामेश्वर कॉलनी) व दीपक वामन सुवा (२५, रा. विठोबानगर) यांचा समावेश आहे. किशोर चौधरी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी दुपारी २:३० वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दीपक सुवा हा युवक ९० टक्के भाजला गेला होता. त्यामुळे त्याला गुरुवारी सकाळी मुंबईला हलविण्यात आले होते. मात्र, नाशिकपर्यंत गेले असता, त्याचा वाटेतच मृत्यू झाला. दरम्यान, जखमींपैकी अजून दोन कामगारांची प्रकृती गंभीर आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे