
रावेर – निंभोरा पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार 20 हजार लाच मागणी प्रकरणी एसीबी च्या जाळ्यात.सुरेश पवार, पोलीस हवालदार, निंभोरा पोलीस स्टेशन, असे त्यांचे नाव आहे. सदर प्रकारामुळे लाचखोराच्या गोठ्यात खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांनी शेतकरी यांच्याकडून एक लाख २७ हजार रुपये किमतीचा केळीचा माल घेऊन तो दिल्ली येथील व्यापारी यांना विकला होता परंतु सदर मालाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाही म्हणून त्यांनी तक्रारदार यांचे विरुद्ध तक्रार अर्ज केला होता त्याप्रमाणे सुरेश पवार, पोलीस हवालदार, निंभोरा पोलीस स्टेशन यांनी तक्रारदार यांना तक्रार अर्जाची चौकशी कामे निंभोरा पोलीस स्टेशन येथे बोलवले होते परंतु सुरेश पवार, पोलीस हवालदार हे तक्रारदार यांच्याकडे तक्रार अर्जात नमूद केलेल्या रकमेच्या दहा टक्के प्रमाणे लाच रक्कम मागितली अशी अशी तक्रार दि.०७/१०/२०२५ रोजी ला प्र वि जळगांव विभागाकडे दिली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दि.०७/१०/२०२५ रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी कार्यवाही आजमावली असता यातील सुरेश पवार, पोलीस हवालदार यांनी तक्रारदार यांच्या विरुद्ध दाखल अर्ज चौकशीमध्ये गुन्हा नोंद न करण्यासाठी त्यांना अर्ज चौकशी कामी योग्य ती मदत करण्याची मोबदल्यात सुरेश पवार, पोलीस हवालदार यांनी तक्रारदार यांच्याकडे निंबोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना पैसे द्यावे लागतील असे सांगून २०,०००/- रुपये लाचेची मागणी केली आहे. म्हणून त्यांचे विरुद्ध वर प्रमाणे लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई जळगाव एसीबी चे पोलीस उप अधिक्षक योगेश ठाकुर,पोलीस निरीक्षक, स्मिता नवघरे,पोहेकॉ / किशोर महाजन, मपोहेकॉ/संगीता पवार, पोकॉ/ राकेश दुसाने, पोकॉ/अमोल सुर्यवंशी, पोकों/भुषण पाटील यांनी केली.