जळगाव

महापालिकेच्या शाळा बंद करण्याचे जळगावात रॅकेट , जळगावच्या तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

जळगाव – महापालिकेच्या शाळा बंद करण्याचे जळगावात रॅकेट, कमलेश देवरे नामक तरुणाने मुख्यमंत्र्यांना ईमेल द्वारे पत्र पाठवले आहे.पत्रातील मजकूर असा आहे ,जळगाव महापालिकेच्या शाळा स्लम भागात राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वाहिनी ठरत होत्या, मात्र जळगाव शहरात महापालिका शाळांचं शैक्षणिक वाटचाल उध्वस्त करण्याचे रॅकेट जळगाव शहरात सक्रिय झाल्याने महापालिका शाळा व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या अनेक दिवसापासून जळगाव महापालिकेत शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आले आहे, प्रशासनाकडे यासाठी खास उपाय योजना नाहीत. काही दिवसांपूर्वीच महापालिका क्षेत्रात प्रशासक बसले आहे. तत्कालीन सत्ताधारी असतानाच त्यापूर्वीपासून शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आले होते, महापालिकेच्या शाळा गोरगरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या होत्या, मात्र त्या शाळांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था करण्यात आली. जेणेकरून नाईलाजाने पालक चांगल्या शिक्षणाच्या नावावर पालकांना आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी नाईलाजाने खाजगी शाळा कडे वळावे लागत आहे. आपल्या पाल्यांना शिक्षण देण्याच्या कारणामुळे अनेक पालक कर्जबाजारी अवस्थेत पोहोचले आहे. मध्यमवर्गीय परिस्थिती असल्या कारणाने परिवार चालवणे देखील अनेकांना कठीण झाले आहे. आपण अंत्योदय योजनेच्या माध्यमातून जे गहू, तांदूळ धान्य देत आहात त्यामुळे अनेकांना जरी दिलासा मिळाला असला तरी आपल्या आपल्या पाल्यांना शिक्षण देणे कठीण झाले आहे.

महापालिकेकडे विविध उपक्रम राबवण्यासाठी पैसा आहे. मात्र गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी पैसा नाही ही दुर्दैवी बाब जळगाव महापालिकेची आहे. यामुळे महापालिकेच्या मध्यवर्ती भागात कोट्यावधीच्या मालमत्ता असणाऱ्या शाळा बिल्डर्स लॉबीच्या नजर कैदेत आहे. यामुळे सर्वच मिली भगत असल्याने याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. नाईलाजाने कर्जबाजारी होऊन पालक खाजगी शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेत आहे. अनेक पालकांना परिस्थिती नसल्यामुळे आपल्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित ठेवावे लागत आहे. मात्र अशा मध्यवर्ती कुटुंबांना शैक्षणिक उंची गाठण्यासाठी महापालिका शाळा वरदान ठरत होत्या. दहावीपर्यंत असणाऱ्या बऱ्याच महापालिकेच्या शाळा अतिशय अखेरची घटका मोजत आहे. खाजगी शाळांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक जळगाव शहरात झालेला आहे. चांगल्या प्रतीच्या शिक्षणाच्या नावावर पैशांची आर्थिक लुबाडणूक पालकांकडून केली जात आहे मात्र या सर्व प्रकाराकडे जळगावच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.

कारण अनेक खाजगी संस्थांमध्ये संचालक, संस्था चालक, त्यासोबतच स्वतः मालक असल्याकारणाने यामध्ये कोणीही हस्तक्षेप करायला तयार नाही यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जात आहे. शासन मोठ्या प्रमाणावर उद्याची पिढी घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात योजना अंत पण जळगाव महापालिका गोरबरीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अडसर ठरत अपवाद आहे. मात्र उद्याचा देश घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा महापाप जळगाव शहरातील शैक्षणिक लॉबी करत आहे. यासाठी आपण प्रत्यक्ष प्रत्यक्ष लक्ष घालून जळगाव शहरातल्या महापालिकेच्या शाळांना पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी महापालिका प्रशासनाला सक्तीचे आदेश द्यावे..

मोठ्या प्रमाणात खाजगी शाळेची डोनेशन फी यासोबतच वर्षभराचा शैक्षणिक खर्च शाळेत येण्या जाण्यासाठी लागणारे वर्षभराचा वाहन खर्च यामध्ये पालक आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे अहवाल – दिल झाला आहे. महोदय, आहेत आपण आरोग्य चळवळीतून अनेक रुग्णांना आधार देत आहात त्यामुळे गोरगरिबांना मोठा आधार मिळत आहे, अगदी त्याचप्रमाणे शैक्षणिक आरोग्यात देखील आपण पुढाकार घ्यायला ही नम्र विनंती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. सदर विनंती तरुणाने ईमेल द्वारे पत्र पाठवून केली आहे.

ईतर महत्वाच्या बातम्या

एकच मुलगी अपत्य असणाऱ्या पालक व मुलींचा सत्कार..

१० हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक ACB च्या जाळ्यात..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे