जळगाव

रस्ते , पुलांसाठी व चांदसर शासकीय आश्रम शाळेसाठी 29.50 कोटीचा निधी मंजूर..

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा

 

जळगाव – प्रतिनिधी  :- मुंबई येथे सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधवेशना दरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघात पाच रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी 15 कोटी तसेच चांदसर येथील शासकीय आश्रम शाळा – शालेय इमारतीच्या बांधकामासाठी 14 कोटी 50 लक्ष इतका निधी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने एकूण 29.50 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणारे प्रमुख जिल्हा मार्ग रस्ते व त्यावरील पुलांच्या विकासाकरिता 15 कोटी निधीचा समावेश आहे. दळणवळणाची साधने चांगली उपलब्ध असतील तर रोजगार व उद्योग वाढीला चालना मिळते. ही बाब लक्षात घेऊन मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणले गेले आहे. रस्ते विकासासाठी व शालेय इमारत बांधकामासाठी विकासास मदत होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.*

रस्ते व पुलांसाठी 15 कोटी तर चांदसर शासकीय आश्रम शाळेसाठी 14.50 कोटी निधी मंजूर.

जळगाव तालुक्यातील असोदा ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 06 – मकरा पार्क ते तरसोद – भादली बु. रस्ता. प्रजिमा – 152 किमी 7/00 ते 10/000 (भाग मकरा पार्क ते तरसोद) चे जलनिस्सारणासह सुधारणा करणे 3 कोटी, देव्हारी – धानवड – चिंचोली रस्ता प्रजिमा-109 किमी 3/00 व 5/00 वर लहान पुलाचे बांधकाम करणे – 3 कोटी, रिधूर – नांद्रा – चांदसर रस्ता प्रजिमा – 85 कि.मी 1/630 वर लहान पुलाचे बांधकाम करणे – 3 कोटी तर धरणगाव तालुक्यातील, कवठळ – शेरी रस्ता प्रजीमा – 85 किमी, 13/400 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे – 3 कोटी, नांदेड – साळवा रस्ता प्रजीमा – 02 साळवा गावामध्ये कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे 3 कोटी अश्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख जिल्हा मार्ग पूल व रस्त्यांसाठी 15 कोटी निधीच्या रस्त्यांना मान्यता मिळाली असून चांदसर येथील शासकीय आश्रम शाळा – शालेय इमारतीच्या बांधकामासाठी 14 कोटी 50 लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

रस्ते व पूल मजबुत असतील तर वाहने गतीमान होऊन वेळेची बचत होते. चांगले पूल व रस्ते हे फक्त दळण – वळणासाठी नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. पुलाच्या कामांमुळे गावं जोडली जावून रस्ते विकासामुळे गावा – गावा पर्यंत आरोग्य, शिक्षण व रोजगार पोहचतो. दर्जेदार रस्ते व पूल करण्यासाठी यापूर्वीही जाणीवपूर्वक प्रयत्न केल आहे. रस्ते व पुलांसाठी सुमारे 15 कोटी तर चांदसर शासकीय आश्रम शाळेसाठी 14.50 कोटी निधी मंजुरी मिळाली आहे. – गुलाबराव पाटील

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे