राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची गावठी दारू हातभट्टींवर कारवाई..
मोठ्या प्रमाणात रसायन नष्ट व गावठी दारू जप्त..

जळगाव – राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध गावठी हातभट्टीवर कारवाई करत मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवण्याचे रसायन नष्ट करून मोठ्या प्रमाणात गावठी दारू जप्त केली.

सविस्तर वृत्त असे की,अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या आदेशानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क चाळीसगाव आणि निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक जळगांव यांची दि. 3 आणि 4 अश्या दोन दिवस संयुक्तरित्या जळगांव जिल्ह्यात टाकरखेडे ता.यावल , गिरड ता.पाचोरा, बांबरुड आणि टोणगावं ता.भडगाव अश्या परिसरात जोरदार हातभट्टी मोहिम राबवण्या आली. असून सदर मोहिमेत एकूण 06 गुन्हे नोंद करण्यात आले 06 आरोपीना अटक करण्यात आली.4980 लि. रसायन नाश आणि 240 लि. गावठी हातभट्टी दारू देखील जप्त करण्यात आली.

तसेच सदर कार्यवाहीत गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करतांना 2 मोटर सायकल देखील जप्त करण्यात आल्या.असून 3,34,550 /- रुपयाचा मुद्देमाल विभागातर्फे पकडण्यात आला.
सदर कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अशोक तारू , निरीक्षक किशोर गायकवाड, दुय्यम निरीक्षक योगेश सूर्यवंशी , मुकेश पाटील , भाऊसाहेब पाटील , रघुनाथ सोनवणे , नंदकिशोर पवार , विठ्ठल हटकर , गिरीश पाटील,राहुल सोनवणे , पूनम पाटील यांच्या पथकाने केली.
सदरच्या कार्यवाहीने गावठी हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.