जळगाव

1 लाख 80 हजाराची लाच, जिल्हा परिषदेचा वरीष्ठ लिपीक  ACB च्या जाळ्यात..

जळगाव – येथील  जिल्हा परिषदेतील  वरिष्ठ लिपीकास 1लाख 80 हजाराची लाच घेतांना जळगाव एसीबी च्या पथकाने रंगेहाथ पकडले. असुन  नरेंद्र किशोर खाचणे, (वरिष्ठ लिपीक  सामान्य प्रशासन विभाग, जि. प.जळगाव  )  असे त्याचे नाव  असुन या कारवाईने लाचखोरांच्या गोठ्यात मोठी खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार हे लोकसेवक असुन तक्रारदार यांची सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र यावल येथे शिपाई पदावर कार्यरत होते .त्यांची स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक या पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती .बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी यातील नरेंद्र किशोर खाचणे वरिष्ठ लिपीक यांनी तक्रारदार यांचेकडे २,००,०००/- रू.मागणी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव येथे दि.२१/०८/२०२४ रोजी तक्रार दिली होती .सदर तक्रारीची लाच मागणीची पडताळणी केली असता नरेंद्र किशोर खाचणे वरिष्ठ लिपीक  यांनी पंचासमक्ष तडजोडअंती १,८०,०००/- रुपये लाचेची मागणी करून स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर शनिपेठ पोलीस स्टेशन, जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पर्यवेक्षक अधिकारी पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पो.नि.एन.एन.जाधव, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पो.हे.कॉ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ. प्रणेश ठाकूर, पोना. किशोर महाजन, पो.ना. सुनिल वानखेडे, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ. राकेश दुसाने, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. सचिन चाटे यांनी कारवाई केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे