दोन खून एक हाप मर्डर करणाऱ्याच्या अमळनेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

अमळनेर: (प्रतिनिधी) – तालुक्यातील उंदिरखेडा येथील शोभाबाई रघुनाथ कोळी (वय- ४८) या घरकाम करणाऱ्या महिलेचा सुमठाणे शिवारात खून झाल्याची बाब उघडकीस आली होती. या प्रकरणात सुमठाणे येथील अनिल गोविंदा संदानशिव याला पोलिसांनी अटक केली आहे. तर दगडाने ठेचून त्यांचाचा खून केल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान, २३ रोजी त्याच घटनस्थळापासून अवघ्या ८०० मीटर अंतरावर अमळनेर तालुक्यातील जानवे हद्दीत पोलिसांना वैजंताबेन भगवान भोई (वय ५०) यांचे आधारकार्ड, इतर साहित्य, हाडे, चपला आढळून आल्या होत्या. तर सुमठाणे शिवारातील खून ही अमळनेर पोलिसांना आधी कळल्याने पो.नि. दत्तात्रय निकम यांचा संशय बळावला होता. त्यांनी तपासाची चक्रे फिरवली.
दरम्यान, वैजंताबेन या मूळ एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील असून त्या २ मे रोजी सुरत येथून गावी आल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा सुरत गेल्या होत्या. तर तेथूनच त्या बेपत्ता झाल्या होत्या. त्या हरवल्याबाबची नोंद सुरत पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. दरम्यान, पो.नि. दत्तात्रय निकम यांनी चहूबाजूने तपास सुरू केला. तर सर्व हाडे, साहित्य जप्त केले असून फॉरेन्सिक प्रयोगशाळे मार्फत डीएनए चाचणी केली. तसेच तांत्रिक माहिती उपलब्ध केली.
या तपासात असे आढळले की, अनिल गोविंदा संदानशिव हा सुरतहून वैजंताबेन यांच्यासोबत संपर्कात आला. ३ रोजी त्या परत सुरतला आल्यात. त्यानंतर त्या पुन्हा त्यांच्या संपर्कात आल्या. दरम्यान, ५ रोजी पहाटे तो त्या महिलेला धुळ्याकडून जानवे जंगलात घेऊन आला. अन् ५ रोजी पहाटे ४ ते ४.३० वाजेच्या सुमारास संदानशिव याने वैजंताबेन यांचा खून केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. या प्रकरणी अनिल संदानशिव याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर विनायक कोते यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउपनि समाधान गायकवाड पोउपनि नामदेव बोरकर, पोउपनि शरद बागल नेम. स्थागुशा, पोहेकॉ कैलास शिंदे, पोहेको काशिनाथ पाटील व पोकी। सागर साळुंखे यांनी केली आहे.