एरंडोल -पारोळा मतदारसंघात महायुतीकडून डॉ. संभाजी पाटीलांची वर्णी लागणार..
पारोळा (प्रतिनिधी) : अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा आणि सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या डॉ संभाजीराजे पाटील वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सक्रिय काम करत आहेत. सहा महिन्यापूर्वीच पक्ष प्रमुख अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि पक्षाच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत डॉ संभाजीराजे यांनी हजारोच्या वर कार्यकर्त्यांचे समवेत पक्षात प्रवेश करून शासनाच्या योजना या प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू केले आहे.
पारोळा एरंडोल मतदारसंघात त काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने मतदार संघात घेतलेल्या ६५,००० वर नागरिकांच्या प्रत्येक्ष भेटी घेवून त्यांची विविध मार्गाने मदत केळी असल्याने त्यांना मोठा प्रतिसाद मतदारसंघातून मिळताना पाहायला मिळत असून स्वतः जनतेनेच डॉ. संभाजी राजे पाटील यांनी विधानसभेची निवडणूक लढावी अशी मागणी केली.
नुकत्याच महायुतीकडून करण्यात आलेल्या सर्व्हे मध्ये देखील डॉ. संभाजीराजे यांच्या बाजूने मोठे जनमत असल्याचे समोर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना तातडीने मुंबईला बोलवून घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून महायुतीकडून डॉ. संभाजी राजे पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.एरंडोल- पारोळा मतदारसंघात एक नवीन चेहऱ्याला संधी मिळणार? विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार? अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे.