1 लाखाची लाच : वनविभागाचे महिला वनपाल, वन कर्मचाऱ्या सह सॉ. मिल मालक ACB च्या जाळ्यात..

पारोळा – येथे निबांच्या लाकडाने भरलेला ट्रक सोडविण्यासाठी 1 लाख लाच प्रकरणी पारोळा वनविभागाचे वनपाल एक वनविभागाचा कर्मचारी व खाजगी इसम सॉ. मिल मालक एसीबी च्या जाळ्यात अडकले.वैशाली गायकवाड, वनपाल (वर्ग 3) नेमणुक वन विभाग, कार्यालय पारोळा, 2) खाजगी इसम श्रीकृष्ण सॉ मिल पारोळा चे मालक सुनिल धोबी 3) एक वन विभागाचा कर्मचारी, नेमणुक वन विभाग, कार्यालय पारोळा असे त्याची नावे आहेत.
यातील मुळ तक्रारदार यांचा भाऊ यांनी शेतातील निबांचे झाडे तोडुन मालेगांव येथे नेण्यासाठी ट्रक मध्ये भरुन घेवुन जात असतांना सावित्री फटाके फॅक्टरी समोर वन विभागाचे वनपाल वैशाली गायकवाड, एक वनविभागाचा कर्मचारी व सुनिल धोबी सॉ मिल वाले अश्यांनी पकडली.
सदरची ट्रक ही बेकायदेशीर लाकुड वाहतुक केल्याचे कारण वनविभागाचे लोकसेवक वैशाली गायकवाड यांनी सांगुन दि. 14/10/2024 रोजी ट्रक पकडली. सदर वाहन लोकसेवक वनपाल वैशाली गायकवाड यांनी श्रीकृष्ण सॉ मिल पारोळा येथे लावुन दिली होती त्यानंतर तकारदार व तक्रारदार यांचा भाऊ असे वेळोवेळी वनपाल वैशाली गायकवाड व एक वन विभागाचे कर्मचारी यांना भेटुन गाडी सोडण्याची विनंती केली असता वनपाल यांनी सदर गाडी सोडण्याचे मोबदल्यात सुरवातीला 2,50,000/- रुपये ची मागणी केली, व त्यानंतर तडजोडीअंती वनपाल वैशाली गायकवाड व वनविभागाचा एक कर्मचारी यांनी 1,00,000/- रुपये खाजगी इसम सुनिल धोबी यांच्याकडे देण्यास सांगितले होते.
त्यानंतर दिनांक 10/12/2024 रोजी यातील तक्रारदार यांनी तकार दिली होती सदर तक्रारीवरून दि. 10/12/2024 रोजी पडताळणी दरम्यान खाजगी इसम सुनिल धोबी व वनपाल वैशाली गायकवाड व एक वनविभागाचा कर्मचारी यांनी श्रीकृष्णा सॉ मिल, पारोळा जि. जळगांव येथे तक्रारदार यांचा भाऊ यांचेकडुन शेतातील निबांचे झाडे तोडुन भरलेला ट्रक ही बेकायदेशीर लाकुड वाहतुक केल्यामुळे पकडल्याचे कारण सांगुन सदर वाहना विरुध्द कोणतीही कायदेशिर कारवाई न करण्यााच्या मोबदल्यात लाच म्हणून 1,00,000/- रुपये लाचेची रक्कम पंच साक्षीदारां समक्ष मागणी केल्याचे निषन्न झाले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई एसीबी चे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर, पोलीस निरीक्षक नेहा तुषार सुर्यवंशी, लाप्रवि नाशिक, पोना/ राकेश दुसाणे, पोना / बाळु मराठे सर्व ला.प्र.वि. जळगांव, पोहवा / विनोद चौधरी, चा.पोहवा / परशुराम जाधव, दोन्ही ला.प्र.वि. नाशिक, पोहवा / नरेंद्र पाटील, पोना/सुभाष पावरा दोन्ही ला.प्र.वि. नंदुरबार यानी केली.