पारोळा जवळ बस व टेम्पोचा भीषण अपघात एक ठार अनेक जखमी..

पारोळा – आज रोजी भडगाव रोडवर बस व टेम्पोचा भीषण अपघात झाला त्यात एकाचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.सोयगावहून धुळ्याकडे जाणारी महामंडळाची एसटी बस (क्र. MH-14-BT-1984) समोरून येणाऱ्या खासगी टेम्पोला (क्र. MH-19-CY-1606) धडकली. अपघात इतका जोरदार होता की दोन्ही वाहनांतील प्रवासी जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मदतीसाठी घटनास्थळी धावून आले. त्यांनी तातडीने जखमींना पारोळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या अपघातात पंकज पाटील (३०, उंदीरखेडा) यांचा मृत्यू झाला आहे. तर मीराबाई सोनवणे (५५), निलाबाई सिरसागर (७५), अंजनाबाई पाटील (७०), मनोहर पाटील (६०), रमेश चौधरी (८०), मीराबाई पाटील (८०) आणि जानवी मोरे (१९) यांच्यासह इतर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर पारोळा व भोले विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू होते.