पारोळ्यात बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त : पारोळा पोलीसांची मोठी कारवाई..

पारोळा– पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की, पारोळा पोलीस स्टेशन हददीत एक बनावट देशी दारु टैगो पंच कंपनीचा देशी दारुचा कारखाना आहे. सदरची मिळालेली माहितीवरुन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस स्टेशन हददीतील बहादरपुर गावाच्या शिवारात असलेली बोरी नदीच्या किनारावर एक लोखंडी पत्राच्या शेड मध्ये बनावट अवैद्य देशी टैंगो पंच नावाचा कारखाना असल्याची खात्री झाल्यानंतर सदर ठीकाणी छापा टाकण्यात आला.

त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठ्या सह मुददेमाल जप्त करण्यात आला.
९० एम.एल. मापाच्या टॅगो पंच तयार सीलबंद विक्रीसाठी तयार ३१ खोके असून एका खोक्यात १०० नग एकूण ३१०० नग असलेले एक खोक ४००० रुपये किमतीचा असे एकूण १ लाख २४ हजार रुपये किंमतीचा,९० एम.एल. मापाच्या टैंगो पंच तयार माल परंतू सीलबंद व लेबलींग करणे बाकी असलेला विक्रीसाठी तयार करण्यासाठी असलेल्या ७०० बाटल्या एक बॉटल छापील किंमत ४० रुपये असे एकूण ७०० बॉटल एकूण २८ हजार रुपये अंदाजे किंमतीची ,स्पिरीट ४ बॅरल २०० लीटर प्रमाणे एकूण ८०० लीटरा कच्चामाल ३ लाख ५५ हजार रुपये अंदाजे किंमतीची,७५० लीटर च्या २ टाक्यात ज्यात तयार दारु मशिन मधून बॉटल मध्ये पॅकींगसाठी तयार १५०० लीटर एकूण ३ लाख रुपये अंदाजे किंमतीची दारु साठी लागणारे आर.ओ. मशिन सेटअप ऑटोमॅटीक मशीन ५ लाख रुपये अंदाजे किंमतीची CNC मशिन कॉम्प्युटर न्युमिरीकल कंट्रोल मशीन बॉटल सिलींग व पॅकींग कामी असलेली मशिन ५ लाख रुपये अंदाजे किंमतीची ,पाणी लिप्टींग करण्यासाठी मशिन ५ हजार रुपये अंदाजे किमतीची ,किंग इंडीया कंपनीचे विद्युत स्टॅपीलायझर मशिन ५ हजार रुपये अंदाजे किंमतीची ,३ बॉक्स टैंगो पंच बुच ३० हजार नग ७५ हजार रुपये अंदाजे किंमतीची ,टैंगो पंच पॅकींग करण्यासाठी खाली बॉटल ९० एम.एल. मापाची १ बॉक्स मध्ये १२०० नग असलेली एकूण ५१ बॉक्स त्यात ६१,२०० नग असलेला खालील बॉटल ६ लाख १२ हजार रुपये अंदाजे किमतीची ,१००० लीटर पाणीच्या टाक्या २ नग ६००० प्रति नग एकूण १२ हजार रुपये अंदाजे किंमतीची ,७५० लीटर पाणीच्या टाक्या २ नगर ४५०० प्रति नगर एकूण ९००० हजार रुपये अंदाजे किंमतीची ,ईलेक्ट्रीक स्टाटर व इलेक्ट्रीक पयुज असलेली पेटी ३००० हजार रुपये अंदाजे किंमतीची ,मिक्सर मशिन एक नग ५००० हजार रुपये अंदाजे किंमतीची ,१ बोलेरो महिंद्रा कंपनीची मालवाहु गाडी, अंदाजे किंमत ५ लाख रुपये अंदाजे किंमतीची १ स्वीष्ट डीझायर मारोती सुजुकी कंपनीची कार अंदाजे किंमत ५ लाख रुपये अंदाजे किंमतीची ,४० बाय ४० लोखंडी पत्राचे शेड अंदाजे किंमत ५ लाख रुपये किंमतीचे शेड. ४० लाख ३३ हजार रुपये किंमतीची कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई
उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते, पोलीस निरीक्षक सचिन सिताराम सानप, पोउपनि अमोल कचरु दुकळे, पोलीस हवालदार सुनिल कौतिक हटकर, महेश रामराव पाटील, डॉ. शरद तुकाराम पाटील, प्रविण शालीग्राम पाटील, पोलीस अंमलदार अनिल तुळशीदास राठोड, अजय महारु बाविस्कर, आकाश काडू माळी, विजय अशोक पाटील, शेखर देविदास साळुंखे, चालक पोह संजय लोटू पाटील, चालक पोह वेलचंद बाबुराव पवार यांनी केली
जिल्ह्यात एवढया मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारूचा कारखाना सर्रासपणे सुरु होता. सदर कारखाना कोणाच्या आशीर्वादाने सुरु होता. राज्य उत्पादन शुल्क विभाग या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.