मृतांच्या वारसाला २ लाखाचा विमा धनादेश तालुकाध्यक्ष उमेश फेगडे तसेच ब्रँच मॅनेजर सचिन काकडे यांच्या हस्ते वाटप..

यावल दि.२९ ( सुरेश पाटील) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ग्राहक तथा खातेदार असलेल्या मृतांच्या वारसाला २ लाखाचा विमा धनादेश वितरण भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे तसेच ब्रँच मॅनेजर सचिन सूर्यभान काकडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत हिरालाल लालचंद पंडित बाबुजीपुरा यावल यांचे खाते महाराष्ट्र ग्रामीण बँकेत होते व त्यांच्या बँकेच्या खात्यात त्यांनी विमा काढलेला होता महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये एलआयसी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा हा केवळ ४३६ रुपये कपात करून काढण्यात आला होता दरम्यान त्यांचे अकस्मात निधन झाले तेव्हा त्यांच्या निधना पश्चात त्यांचे वारस किरण हिरालाल पंडित यांना बँकेत बोलून शाखा व्यवस्थापक सचिन सूर्यभान काकडे यांच्या आज वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी उमेश रेवा फेगडे तसेच भूषण फेगडे चेतन अढळकर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हजार होते त्यांनी बँकेतर्फे दोन लाखाचा धनादेश वाटप केला.
त्याप्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे असिस्टंट मॅनेजर वैशाली नगराळे. जानवी खोडे रोखपाल,चेतन सिंह राजपूत,मेसेंजर महेश दत्तात्रय खाचणे,भूषण महाजन यांची उपस्थिती होती दरम्यान नागरिकांनी अल्प स्वरूपात विमा रक्कम असते तेव्हा ज्या बँकेत आपले खाते असेल त्या बँकेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढायला हवा घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्युपश्चात अल्पशा स्वरूपाची जरी विमा रक्कम असली तरी आपल्या मृत्यूनंतर कुटुंबास मोठा आधार मिळतो महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आतापर्यंत ४१ क्लेम पास करून वारसांच्या खात्यात ८२ लाखाचे धनादेश वारसांना देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ब्रांच मॅनेजर राजेश बाबुराव हिंगणेकर,आशिष सातपुते,मयूर पवार,विक्रम डकाते, यांनी वेळोवेळी कॅम्प घेऊन ग्राहकांना विविध प्रकारची माहिती देऊन विम्याची माहिती देऊन खातेदारांचे विमा फॉर्म भरून अटल पेन्शन योजना फॉर्म हे भरून घेतले महाराष्ट्र ग्रामीण बँकेने अजूनहि कॅम्प घेऊन खातेदारांना त्याचे महत्त्व पटवून देत आहे अजून कोणी खातेदार विमा वंचित असतील तरी त्यांनी विमा काढून घ्यावे ब्रांच मॅनेजर सचिन सूर्यभान काकडे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल फालकनगर भुसावल रोड यावल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.