दिवाळीत धूम – धडाका ‘धनुष्यबाणाचा’ प्रचार जोरात..
धरणगाव /जळगाव – महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून प्रचाराचा झंझावात सुरु झाला असून घर तेथे ‘धनुष्यबाण’ पोहचविण्याचे काम सुरु असून”कहो दिलसे, गुलाबराव पाटील फिरसे” हा नारा गावा – गावांमधील प्रचार रॅलीमध्ये गाजत आहे. युवक , जेष्ठ नागरिक , दिव्यांग बांधव हे स्वयंस्फुर्तीने गुलाबराव पाटील यांना रॅलीमध्ये भेटत असून भक्कम विजयाची हमी देत आहे. “घरोघरी धनुष्यबाण” हे मिशन पोहचविण्याचे काम महायुतीचे कार्यकर्ते करीत असून गुलाबराव पाटील जनतेशी थेट संपर्क साधत असल्यामुळे त्यांना दिव्यांगांसह जेष्ठांचे आशीर्वाद व दुवा मिळतांना दिसत आहे.
दिवाळीत धूम – धडाका ‘धनुष्यबाणाचा’ प्रचार जोरात
धरणगाव तालुक्यातील वराड बु.,वराड खु., हिंगोणे बु., हिंगोणे खु., कल्याणे ब., कल्याणे होळ, कल्याणे खु. भोंद बु., भोंद खु, पिंप्री या गावांमध्ये आज प्रचार संपन्न झाला. ऐन दिवाळीत धूम-धडाक्यात प्रत्येक गावात औक्षण, ढोल-ताशांच्या गजरात गुलाबराव पाटील यांच्यावर पुष्पीवृष्टी होवून प्रचाराला भरघोस जनतेचा पाठींबा मिळत आहे.
यावेळी रॉ.कॉ. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. जळकेकर महाराज, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, महिला जिल्हा प्रमुख सरिताताई कोल्हे- माळी, अनिल अडकमोल, जि. प. सदस्य गोपाल चौधरी, भाजपाचे पी. सी आबा पाटील, निर्दोष पवार, जगन पाटील , तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, संजय पाटील सर, गजानन पाटील, माजी सभापती अनिल पाटील, नवल बोरसे, प्रेमराज पाटील, सचिन पवार, भगतसिंग पाटील, रॉ. कॉ. चे आर. आर. पाटील, नाटेश्वर पवार, अरविंद मानकरी, नाना भालेराव, मंगलअन्ना पाटील, मनोज पांडे, माजी सरपंच राजू पाटील, भोद सरपंच विजय पाटील, संदीप पाटील, पितांबर पवार, बाळु पाटील, मनोज मालू, सरपंच आबा धोबी, ज्ञानेश्वर बडगुजर हाजीसाहेब, रणजीत सिंग पाटील, महेंद्र पाटील, विक्रम पाटील, टिकाराम पाटील, भगवान सैंदाणे, हेमंत पाटील, नारायण पाटील, युवसेनेचे पवन पाटील, गणेश चौधरी, आशिष सपकाळे, अमोल पाटील, मुन्ना पाटील, राजू पाटील , चुनिलाल पाटील, यांच्यासह जळगाव शहरातील नगरसेवक व परिसरातील महायुतीचे सरपंच, पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.