मतदारांनी रोहिणी खडसे यांना दिला विजयी भव चा आशिर्वाद..
मुक्ताईनगर – मुक्ताईनगर विधानसभा मतदासंघ निवडणुक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर शहरातील विविध प्रभागात जन आशिर्वाद रॅली काढून मतदारांशी संवाद साधत मतदारांचे आशिर्वाद घेतले आणि आपल्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरिल बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन केले
यावेळी रोहिणी खडसे यांच्या जन आशीर्वाद रॅलीला मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभला प्रभागा प्रभागात महिला भगिनींनी रोहिणी खडसे यांचे औक्षण केले तर ज्येष्ठांनी विजयी भव चे आशीर्वाद दिले युवकांनी परिवर्तनाच्या लढाईत आम्ही सोबत असल्याचे रोहिणी खडसे यांना अश्वस्त केले
यावेळी मतदारांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या गेले तिस वर्ष तुम्ही सर्वांनी आ एकनाथराव खडसे यांना खंबीर साथ आणि आशीर्वाद दिले त्या खंबीर साथ आणि पाठबळावर आ एकनाथराव खडसे यांनी मतदारसंघात विकासाची गंगा आणली गोरगरीब जनतेची सेवा करणे हे कर्तव्य मानून विरोधकांनी टिका केली तरी टिके कडे दुर्लक्ष करून सतत जनतेच्या सेवेत राहिले त्यामुळे जनतेने सतत सहा पंचवार्षिक त्यांच्यावर विश्र्वास टाकला त्यांच्याकडून जनसेवेचा वसा वारसा घेऊन आ एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्या साहेब पाटिल, अरुण दादा पाटिल, राजाराम महाजन, उदयसिंह पाटील आणि ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवडणूक लढवत असुन मतदानरुपी आशीर्वाद देऊन विजयी करण्याचे रोहिणी खडसे यांनी मतदारांना आवाहन केले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र माळी यांनी मतदारांशी संवाद साधताना आ.एकनाथराव खडसे यांनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करताना मतदारसंघाला एक नविन ओळख मिळवुन दिली आदिशक्ती मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन या नगरीचे नामकरण मुक्ताईनगर केले. मतदारसंघात व शहरात मुलभूत सुविधांचे निर्माण केले मुक्ताईनगर येथे शासकीय कृषी महाविद्यालय आणले भविष्यात या महाविद्यालया मार्फत परिसरातील शेतकरी बांधवांना शेतीतील नविन तंत्रज्ञान आणि उत्पादन वाढी विषयी मार्गदर्शन लाभेल.जुन्या गावातील अनेक घरे पूर्णा नदीच्या पुरात बाधित होत होते आ एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून पुर बाधित घरांचे पुनर्वसन केले गेले काही घरांचे पुनर्वसन अद्याप बाकी राहिले आहे शहराचे काही प्रश्न बाकी आहेत रोहिणी खडसे या ते भविष्यात नक्कीच मार्गी लावतील त्यासाठी रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे आवाहन राजेंद्र माळी यांनी केले
यावेळी रऊफ खान यांनी मतदारांशी संवाद साधताना अल्पसंख्यांक समुदायातील मुल शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन त्यांच्या मधील कौशल्य विकसित होऊन तांत्रिक शिक्षण मिळावे यासाठी शासकिय पॉलिटेक्निक कॉलेज आणले कॉलेजच्या इमारतीचे बहुतांशी काम पुर्ण झाले आहे परंतु शिक्षणाचे महत्व नसल्याने गेल्या पाच वर्षात हे कॉलेज सुरू होण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाही रोहिणी खडसे या पाठपुरावा करून येत्या शैक्षणिक वर्षा पासुन कॉलेज सुरू करतील असा विश्र्वास आहे
आ एकनाथराव खडसे यांनी तिस वर्ष सर्वसमावेशक राजकारण, समाजकारण करताना मतदारसंघाचा विकास करत असताना जातीय सलोखा , शांतता टिकवुन ठेवत अठरापगड जाती धर्मातील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी दिली याउलट गेल्या पाच वर्षात मतदारसंघाचा विकास रखडला मतदारसंघांत जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला गेला.गेल्या पाच वर्षांपूर्वी विविध आश्वासने देऊन निवडून आल्यावर सतत सत्तेत राहुन सुद्धा दिलेले आश्वासने बैठका आणि कागदपत्रां पुरते मर्यादित राहिले म्हणुन आता मतदरसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रोहिणी खडसे यांना मतदानरूपी आशीर्वाद देउन बहुमताने विजयी करण्याचे रऊफ खान यांनी मतदारांना आवाहन केले
प्रचार रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते