डॉ.अश्विन सोनवणे यांना नागरिकांनी मारली प्रेमाची मिठी !
श्रद्धा कॉलनीसह अनेक परिसरात मतदारांनी दिला विश्वास
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा प्रचार जोरदार सुरु असून शहरातील अनेक भागात आज त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक नागरिकांनी डॉ.सोनवणे यांना प्रेमाने मिठी मारून साद दिली आहे. यावेळी अनेक भगिनी डॉ.सोनवणे यांचे औक्षण करून विजयाचा आशीर्वाद देऊ लागले आहे.
दि.११ नोव्हेंबर २०२४ रोजी शहरातील श्रद्धा कॉलनी, धांडे नगर, विवेकानंद नगर, किसनराव नगर, राजीव गांधी नगर, हरी विठ्ठल नगर, वाघ नगर, जिजाऊ नगर, आरएमएस कॉलोनी, आशा बाबा नगर या परिसरात डॉ.अश्विन सोनवणे यांचा प्रचार दौरा असताना या परिसरातील नागरिकांनी डॉ.अश्विन सोनवणे यांना घरात बोलवून औक्षण केले तर डॉ.सोनवणे यांनी जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद देखील घेतले. डॉ.सोनवणे यांच्या प्रचाराने अतिशय जल्लोषाचे वातावरण निर्माण केले होते. डॉ.अश्विन सोनवणे यांचे कार्यकर्ते, आणि समर्थकांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. परिसरात असलेल्या धार्मिक स्थळी भेट देत आशीर्वाद घेतले.
या परिसरातील अनेक धार्मिक स्थळी डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी भेट देऊन आशीर्वाद देखील घेतले. डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांना विधानसभा निवडणुकीत अनुक्रमांक १० तर निशाणी काचेचा पेला हि मिळाली असून जनतेने येणाऱ्या २० रोजी भरभरून मतदान करावे असे आवाहन देखील डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी केले आहे.