रावेर

संस्था सांभाळणारा आमदार हवा की जनतेचे काम करणारा जनतेने ठरवावा:अमोल जावळे

खिरोदा रोझोदा परिसरात प्रचार  

प्रतिनिधी l रावेर 

भाजप शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (अजितदादा गट) रीपाई (आठवले गट) महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांनी आज ता.11 रोजी रावेर तालुक्यातील खिरोदा,रोझोदा, कळमोदा, सावखेडा आदी.गावात प्रचार फेरी काढली.यावेळी जावळे यांना जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

गुजरात गोध्रा येथील आमदार देखील अमोल जावळे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहे. मतदारांशी संवाद साधताना अमोल जावळे म्हणाले रावेर मतदारसंघ हा विकासाच्या संदर्भात खूपच मागे पडला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार असल्याने राज्यातही पुन्हा महायुती सरकार आवश्यक आहे आणि सरकार हे येणारच आहे, आणि मग केंद्रातून विकासाला मोठा निधी प्राप्त होईल आणि मतदारसंघात विकासाची कामे होतील.

मतदार संघातील प्रत्येक घटकासाठी विकास कामे करण्याची आमची योजना तयार आहे. विजय झाल्यानंतर विकास कामांची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत. विकास हा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे याची आम्ही काळजी घेणार आहोत, तर विकासासोबतच हिंदुत्वाचे रक्षणही करणे ही देखील आमची जबाबदारी आहे. हिंदुत्वाची व्याख्या करताना केवळ एक घटक समोर न ठेवता सकल हिंदू समाज हा विचार समोर ठेऊन सर्वांचा विकास करणे याला आमचे प्राधान्य राहणार आहे. तसेच समाजातील बारा बलुतेदार हे देखील आमच्या सोबत आहेतच. फक्त आपल्या संस्था सांभाळण्यसाठी काही उमेदवार आमदार होण्याची स्वप्न पाहत आहेत.पण मला जनतेची कामे आणि मतदारसंघाचा विकास करायचा आहे.जनतेसाठी मी पूर्णवेळ उपलब्ध राहणार आहे.आपली कामे करणारा आमदार हवा की केवळ आपल्या संस्थांची अनुदाने लाटणारा आमदार हवा हे ठरवण्याची आता आवश्यकता आणि वेळ आली आहे.असे अमोल जावळे यांनी सांगितले.

भाजप पक्षश्रेष्ठींनी अमोल जावळे यांच्या प्रचारासाठी खास गुजरात मधील गोध्रा येथील आमदार पी.सी.बंडोले यांना मतदारसंघात पाठवले असून ते मतदारांची संपर्क साधत आहे. यावेळी सुरेश धनके,गोपाळ नेमाडे, चेतन पाटील, सारिका ताई चव्हाण, ठकसेन पाटील, डॉ मिलिंद वायकोळे, भूषण राणे, वाय.डी पाटील शिवसेना,भगवान पाटील, सागर भारंबे,रोशन सरोदे यांच्या सोबत महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे