राष्ट्रस्तरीय मराठा क्रिकेट लीग च्या ४ थ्या पर्वास आजपासून सुरुवात..

जळगाव (प्रतिनिधी ): जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रस्तरीय मराठा क्रिकेट लीग मराठा रणसंग्राम २०२४ या चौथ्या पर्व चे येथील शिवतीर्थ मैदानावर आज दिनांक २ एप्रिल २०२४ पासून ते ७ एप्रिल २०२४ असे सहा दिवस मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील ३२ संघ मिळून २५ क्रिकेट सामने येथे खेळवले जाणार आहेत. अशी माहिती जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन चे अध्यक्ष विनोद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
https://youtu.be/RQbXo5W1y3U?si=jnJAmBklAVeyI65V
अधिक माहिती देताना विनोद सोनवणे पुढे म्हणाले की आधी जिल्ह्यातील संघ खेळवले जात होते परंतु आता राष्ट्रस्तरीय म्हणजे ४ राज्य, ८ जिल्हे, १० तालुके,आणि १० शहरातली संघ आहे असे मिळून ३२ संघ झालेले आहेत. आणि या माध्यमातून समाजाचे संघटन कसे वाढवले जाईल आणि समाज संघटित कसा होईल या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचलतो आहे… इथे प्रथम बक्षीस १,००,०००/ रुपये, द्वितीय बक्षीस ५१,०००/ रुपये आहे. तसेच जे खेळाडू बाहेरून येतील त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था जिल्हा एकता मराठा फाउंडेशन तर्फे आपण येथे केलेली आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रिकेट संघ कर्णधारांना स्पर्धा लोगो असलेले टी शर्टस् देण्यात आली.

प्रास्ताविकात दिपक आर्डे यांनी राष्ट्रस्तरीय मराठा क्रिकेट लिग ची संकल्पना मुळात चार वर्षापासून अशी होती कि मराठा समाज महाराष्ट्रात इतका मोठा असल्यामुळे पूर्वी एम टी एल स्पर्धा व्हायची ती आपण एमसीएल माध्यमातनं घेतली. प्रत्येक तालुक्यातून एक संघ आणि शहरातले काही निवडक संघ,असे पहिल्या वर्षी २० संघ होते.तर दुसऱ्या वर्षी २४ तिसऱ्या वर्षी २४ आणि आता ३२ संघांनी सहभाग घेतला आहे. ही राष्ट्रस्तरीय स्पर्धा अशी झाली की चार राज्य मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र ८ जिल्हे १० तालुके आणि १० शहर अशा ३२ संघाची ही स्पर्धा आहे. आणि माध्यम एकच की समाज क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येतोय आणि त्यात फक्त क्रिकेटच नाही तर समाजासाठी आपलं काहीतरी देण लागतं म्हणून पहिल्या वर्षी आपण ५१ हॅंडीकॅप मुलांना व्हील चेअर वाटले. नंतर स्वयंरोजगारांसाठी जे ठेले असतात ते ५१ ठेले दुसऱ्या पर्वला दिले. तिसऱ्या गेल्या वर्षी इंदुरीकर महाराजांच्या हस्ते आपण आपल्या समाजाचा स्वर्गरथ यात्रा ही दिलेली आहे. आणि आता हा राज्यस्तरीय स्पर्धा ३२ संघांची यावेळेस अजून नवनवीन प्रयोग येत्या सात दिवसात आपल्याला करायचे आहेत हा मानस ठेवून ही स्पर्धा आपण दरवर्षी करतो .असेही दिपक आर्डे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस सागर पाटील, जयांशु पोळ,अरुण श्रीखंडे यांचे सह एकता मराठा फाउंडेशनचे इतर पदाधिकारी ब सदस्य तसेच क्रिकेट खेळाडू उपस्थित होते.