ऐनपूर येथे किरकोळ कारणावरून दगडफेक गावात तणावपूर्ण शांतता.
बलवाड़ी प्रतिनिधी:- आशीष चौधरी
ऐनपुर येथे दोन गटात वाद निर्माण झाल्यामुळे दगडफेक झाली तात्काळ दंगा पथकास पाचारण करण्यात आले परिस्थिती नियंत्रणात असून गावात तणावपूर्ण शांतता आहे दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच ते सहा लोक जखमी झाले आहेत
याबाबत सविस्तर वृत्त असे की आज सकाळी दहा वाजता बस स्थानक परिसरात दोन गटात युवकांमध्ये वाद निर्माण झाला त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन नंतर दगडफेकीत रूपांतर झाले दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने वातावरण काहीसे भीतीचे झाल्यामुळे दुकाने ताबडतोब बंद करण्यात आली तसेच सकाळची वेळ शाळा भरण्याची असल्यामुळे पालकांमध्ये व मुलांमध्ये सुद्धा भितीचे वातावरण होते. शाळेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर सुद्धा परिणाम झाला. शाळा लवकर सोडण्यात आली .तत्काळ निंभोरा , रावेर, सावदा वरणगाव फैजपूर येथून पोलिसांचे पथक गावात आले तसेच एस आर पी जवान व दंगा नियंत्रण पथक गावात जमा झाले व तात्काळ परिस्थिती आटोक्यात आणली .दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच ते सात लोक जखमी झाल्यामुळे त्यांना रावेर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले . परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तात्काळ गावात दाखल झाले त्यांनी ज्या भागात दगडफेक झाली त्या भागाची पाहणी केली व फैजपूर येथील डीवायएसपी अन्नपूर्णा सिंह यांना परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी आदेश दिले.आज पासून सरदार वल्लभाई पटेल विद्यालयात दहावीचे तोंडी परीक्षा असल्यामुळे विद्यालयात विद्यार्थ्यांचे उपस्थिती काहीशी कमी होती कारण पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये भीती होती तसेच दुपारचे बॅचेस सुद्धा परीक्षेचे रद्द करण्यात आले शाळा लवकर सोडून देण्यात आली. डीवायएसपी अन्नपूर्णा सिंह गावातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे संध्याकाळपर्यंत दगडफेक करणाऱ्या दोन्ही गटातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे काम करण्यात आले असून जखमी झालेल्या पोलिसांकडून सुद्धा दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्याचे काम करण्यात येणार असून जे लोक या दगडफेकीत सहभागी आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याचे काम करण्यात येईल असे अन्नपूर्णा सिंह यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग , प्रांत देवयानी यादव, तहसीलदार बी.एम. कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे निंभोरा पोलीस स्टेशन चे सपोनि हरिदास बोचरे , वरणगांव येथील पोलीस निरिक्षक किशोर पाटील घटना स्थळी उपस्थित होते.