भडगाव – तालुक्यातील पिचर्डे येथे राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्था हैदराबाद, कुषी विज्ञान केंद्र व कुषी विभाग जळगाव,व श्री गिरणाकाठ शेतकरी उत्पादक कंपनी भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पिचर्डे येथे जिल्हास्तरीय केळी पिक परिसंवाद व प्रदर्शन, निर्यातक्षम केळी उत्पादन व फळमाशी नियंत्रण या विषयावर केळी परिसंवाद आयोजित करण्यात आली.
यावेळी जळगाव जिल्हा कुषी अधिकारी कुरबान तडवी, वैज्ञानिक अधिकारी हैदराबाद, डॉ चंद्रशेखर गुप्ता,अपेडाच्या झोनल मॅनेजर प्रणिता चौरे नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे,अपेडा चे मुंबई उपव्यावस्थापक प्रशांत वाघमारे, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर श्रीमती प्रणिता चौरे विठ्ठलगंगा शेतकरी उत्पादक कंपनी माढा चे अध्यक्ष धनराज शिंदे पाचोरा उपविभागीय कृषी अधिकारी किशोर मांडगे,कुषी विज्ञान केंद्राचे डॉ हेमंत बाहेती, केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा किरण जाधव,भडगाव कुषी अधिकारी रमेश जाधव श्री गिरणाकाठ शेतकरी कंपनीचे अध्यक्ष विनोद बोरसे व सर्व संचालक यांच्या परिसरातील पिचर्डे वाडे पथराड बासर घुसर्डी बोधडी पिंपरेहाट कुठली निंभोरा गुडे पांढरद वडजी वरखेडे मेहुनबारे चाळीसगाव येथील केळी बागायतदार मोठ्या संख्येने 400 उपस्थित होते.प्रथमता केळी खोडाची कानुबाई स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली व प्रदर्शनास भेट देण्यात आली प्रदर्शनीमध्ये निर्मल सीड्स झुआरी ऍग्रो इंडस्ट्रीज राम बायोटेक नमो बाय प्लांट यारा फर्टीलायझर पोलन ॲग्री करोलरी किसान सिके बाय प्लांट उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय बायोसिस आधी कंपनीचे स्टॉल प्रदर्शित करण्यात आले होते
यानंतर प्राध्यापक किरण जाधव शास्त्रज्ञ उद्यान विद्या यांनी पिचर्डे प्रात्यक्षिक केळी प्लॉटवर केळी उत्पादनाच्या साठी लागवड केलेल्या केळी प्लॉट वरती टिशू कल्चर रोपांची लागवड बेड पद्धतीचा वापर बेसल डोस फर्टिगेशन फ्रुट केअर प्रॅक्टिसेस मधील बर्ड इंजेक्शन घड फवारणी स्कर्टिंग बॅगचा वापर इत्यादी तंत्राचा पद्धत प्रात्यक्षिकद्वारे सर्व मान्यवर व शेतकरी यांना अवगत करण्यात आले.
त्यानंतर पीक परीसंवादामध्ये डॉक्टर चंद्रशेखर गुप्ता यांनी अपडाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केळी निर्यात मधील अडसर ठरू शकणाऱ्या केळी फळमाशी ची ओळख प्रसार त्याचे योग्य व्यवस्थापन याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले त्यानंतर अपेडा मुंबई येथील बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर श्रीमती प्रणिता चौरे यांनी केळी निर्यातीत लागणाऱ्या सुविधा परवाने व त्याची प्रक्रिया आणि यासाठी लागणारे अपेडा ची मदत या संदर्भात मनमोकळे प्रणाली मार्गदर्शन केले यामध्ये सोलापूर येथून आलेले विठ्ठल गंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक श्री डोके व श्री शिंदे यांनी सोलापूर आणि जळगाव यांच्या केळी लागवडीतील फरक सोलापूरचा निर्यातीतील मोठा वाटा याची कारणमीमांसा सर्व शेतकऱ्यांसमोर मांडली व येथून होणाऱ्या निर्यादिशा चालण्यासाठी सदैव तत्पर असण्याचे आश्वासित केले तसेच विठ्ठल गंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या प्रक्षेत्रावरती आपण शेतकऱ्यांनी येऊन पाहुणचार करण्याची संधी आम्हाला द्यावी असेही आव्हान केले यानंतर नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री अमित तायडे यांनी ही सदर श्री गिरणा काठ एपीओ नाबार्डचे एक महत्त्वकांक्षी शेतकरी उत्पादन कंपनी असून यांना लागणाऱ्या सर्व सुविधा जसे की इंटिग्रेटेड पॅक हाऊस साठी नाबार्ड कडून मदत करण्याचे आश्वासित केले. यानंतर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी श्री कुरबान तडवी यांनी केळी पिकातील निर्यातीसाठी भडगाव क्लस्टर मधील होत असलेल्या चळवळीचे कौतुक केले पण यासाठी बहुतेक सुविधा प्राप्त करून घेऊन प्रत्यक्षात जास्तीत जास्त केळी निर्यात कंटेनर या भागातून भरावेत यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले सदर कार्यक्रमांमध्ये केळी पिकाच्या पोषण मूल्याच्या महत्त्व प्रसारासाठी म्हणून मान्यवरांना केळी रोपटे कुंडी भेट म्हणून देण्यात आली तसेच मध्यंतरी सर्व उपस्थितांना उपहार म्हणून केळी फळ देण्यात आले. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी सुरुची रानभोजनाचा आस्वाद घेतला सदर कार्यक्रम हा प्रत्यक्ष प्लॉट वरती तंत्रज्ञान मार्गदर्शन व प्रदर्शन अशा स्वरूपाचा उत्तम प्रतीचा आयोजकांनी आयोजित केला अशा प्रतिक्रिया प्रत्येक केळी बागायतदार यांनी दिल्या.