शेताच्या बांधावर जाऊन रोहिणी खडसे यांनी तिफन वर केली पेरणी..
बोदवड– पावसाने आठ दिवस दडी दिल्यानंतर शनिवारला समाधानकारक पाऊस झाल्याने रविवार ला तालुक्यात सर्वत्र शेतकऱ्यांची सोयाबिन, उडीद, मुग ,भुईमुग पेरणीची लगबग दिसली जागोजागी शेतात शेतकरी तिफन द्वारे पेरणी करताना दिसत होते
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या रविवारी बोदवड तालुक्यात असताना शेलवड येथे तुकाराम धनु बोदडे हे आपल्या शेतात पेरणी करत असताना रोहिणी खडसे यांना दिसल्या नंतर त्यांनी शेतात जाऊन बियाणे हातात घेऊन तिफन मागे पेरणी केली
रोहिणी खडसे या एकनाथराव खडसे यांच्या कन्या आहेत एकनाथराव खडसे हे जरी राजकारणी, माजी मंत्री असले तरी त्यांचा शेती हा पिढीजात व्यवसाय असुन ते पारंपरिक शेतकरी आहेत आतासुद्धा ते आपल्या शेतात नवनविन प्रयोग करून पिके घेत असतात त्यांचा मुळ पिंड शेतकऱ्याचा असल्याने परिवारातील सदस्यांची देखील शेतीशी नाळ जुडलेली आहे त्यामुळे रोहिणी खडसे यांना शेतातील कामे काही नविन नाही त्यांना बालपणापासून शेतीची शेतातील कामांची ओळख आहे त्यामुळे त्यांनी व्यवस्थितपणे तिफन मागे सोयाबिन बियाण्यांची पेरणी केली
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या बालपणापासून शेती मातीशी नाळ जुळलेली असल्याने शेतातील कामांची सवय असल्याने शेतात पेरणी सुरू असल्याचे बघून पाऊले आपोआपच शेताकडे वळली व बियाणे हातात घेऊन तिफन मागे पेरणी केली बळीराजाने आता पेरणी केली असुन वरुण राजाने कृपा करावी व धरणी हिरवीगार होऊन यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या अंगणात धन धान्याचा राशी लागव्यात व शेतमालाला योग्य भाव मिळावा अशी काळ्या आईच्या चरणी प्रार्थना केली असे रोहिणी खडसे यांनी सांगितले पेरणी साठी बियाणे खरेदी करताना शेतकरी बांधवानी सजगता बाळगावी तसेच पाऊस विजांचा कडकडाट सुरू असताना योग्य ती खबरदारी घ्यावी असे रोहिणी खडसे यांनी शेतकरी बांधवांना आवाहन केले
व शेतकरी बांधवांच्या पेरणी संबंधी अडीअडचणी,बियाणे खतांची उपलब्धता याविषयी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला यावेळी रामदास पाटिल, कैलास चौधरी, किशोर गायकवाड,विजय चौधरी, प्रदिप बडगुजर, किरण वंजारी, दिलीप पोळ उपस्थित होते