जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीला सुरवात, शेती मशागतीच्या कामांना वेग..
जळगाव – जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून यावर्षी हवामान विभागाने पावसाचे आगमन लवकर होत असल्याचा अंदाज सांगितला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ठीक ठिकाणी सध्या खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला सुरवात झाली असून नांगरणी, वखरणी ठिबकच्या नळ्या अंथरणे यासह इतर कामे सुरू झाली आहेत.
अनेक ठिकाणी जमीन सुपीक करण्यासाठी व चांगले पिके यावे यासाठी सेंद्रिय शेणखत टाकण्याचे काम देखील सुरू आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी पाणी बचत होईल यासाठी ठिबक सिंचन करणे ही काळाची गरज असल्याने परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणावर ठिबक सिंचन चे काम सुरू आहे. यावर्षी शेत मालाला चांगला भाव मिळेल या आशेने पुन्हा शेणखत टाकणे सुरू आहे. तर खत, बी-बियाणे घेण्यासाठी देखील शेतकरी नियोजन करीत आहे.
यावर्षी शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा…
मागील वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते मात्र यावर्षी चांगला पाऊस असल्याचा हवामान अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकरी पुन्हा जोमाने कामाला लागला असून यावर्षी तरी चांगले उत्पन्न येईल अशी अपेक्षा शेतकऱ्याला आहे.